Tag Archives: Marathi Kavita

Marathi Kavita Umbarache Phool – उंबराचे फूल – A Romantic Love Poem


Marathi Kavita Umbarache Phool – उंबराचे फूल

marathi kavita umbarache phool

 

 

 

 

नयन हे प्यासे तुझ्या दर्शनाचे,
भाव कळतील का माझ्या मनाचे !

तू गं उंबराच्या फुलावानी,
मज देतेस सदा हुलकावणी !

जीव व्याकुळ तुझ्या गोड़ हसण्याचा,
कधी होईन अंतर्मुख तुझ्या मिलनाचा !

पाहून तुझी शुभ्र कांचनमृगी काया,
मज वाटे जीवन हे तुजविण वाया !!!

*** A poem by Kavi SanBa ***

Marathi Poem Umbarache Phool

Nayan he pyase tuzya darshanache,
bhaav kalatil ka mazya manache !

Tu ga umbarachya phoolawani,
maj detes sada hulkavani !

Jeev Vyakul tuzya goad hasnyacha,
kadhi hoin antarmukh tuzya milanacha !

pahun tuzi shubhra kanchanmrugi kaya,
maj vate jeevan he tuzvin vaya !!!

For more marathi poems (Kavita), please visit Marathi Poems

Marathi Kavita – Nastik, Interested in reading marathi poem “नास्तिक”


Marathi Kavita – Nastik

Below is the marathi kavita from renowned Marathi poet Sandeep Khare.

marathi kavita

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा खर तर गाभा-यातच भर पडत असते
की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना,
पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा होते निर्माण
देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा को-या नजरेने पाहत राहतो
सभोवतालच्या हालचाली, भाविकाच्या जत्रा…
कोणीतरी स्वत:चे ओझे , स्वत:च्याच पायावर
साभाळत असल्याचे समाधान लाभते देवलाच !

म्हणून तर एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदचित !
पण मिळते आकठ समाधान एक सहकारी लाभल्याचे

देऊळ बद झाल्यावर एक मस्त आळस देउन
बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता
देव म्हणतो, ” दर्शन देत जा अधुन मधुन……..
तुमचा नसेल विश्वास आमच्यावर,
पण आमचा तर आहे ना ! ”

देवळाबाहेर थाबलेला एक खरा खुरा नास्तिक
कटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारिने पाठवतो देवळात
तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन
अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे….

* Poet – संदीप खरे

For more marathi poems, please visit Kavita Sangrah

Aayushyavar Bolu Kahi – आयुष्या वर बोलू काही


Marathi Kavita – Aayushyavar Bolu Kahi

Marathi Kavita - Aayushyavar Bolu Kahiजरा चुकीचे… जरा बरोबर……
जरा चुकीचे, जरा बरोबर , बोलू काही…..
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही……

उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू ..
उगाच वळसेे शब्दांचे हे देत रहा तू ….
भीडले नाहीत डोळे तोवर , बोलू काही……
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही……….

तूफान पाहून तीरा वर , कुजबुज्ल्या होडया ..
तूफान पाहून तीरा वर , कुजबुज्ल्या होडया ….
पाठ फीरू दे त्याची, नंतर बोलू काही……..
चला दोस्त हो ;आयुष्या वर बोलू काही……….

हवे-हवे से दुखः तुला जर, हवेच आहे ..
हवे-हवे से दुखः तुला जर, हवेच आहे ….
नको-नको से हळवे कातर, बोलू काही…….
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही……….

“उदया-उदया” ची कीती काळजी , बघ रांगेतुन..
“उदया-उदया “ची कीती काळजी , बघ रांगेतुन….
“परवा” आहे “उदया”च नंतर, बोलू काही……..
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही……….

श्ब्द असू दे हातां मध्ये, काठी म्हनुनी..
श्ब्द असू दे हातां मध्ये, काठी म्हनुनी….
वाट आंधळी, प्र्वास खडतर ,बोलू काही …….
चला दोस्त हो , आयुष्या वर बोलू काही……….

चला दोस्त हो , आयुष्या वर बोलू काही……….

* संदीप खरे

For more marathi poems/kavita, please visit Marathi Kavita Sangrah

Marathi Kavita – Love Letter – लव्हलेटर…….


Marathi Kavita – Love Letter

Marathi Kavita - Love Letterलव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं
सरळ जाऊन बोलण्यापेक्ष इझी आणि बेटर असतं
गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं
घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असतं

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक सॉंग असतं
ज्यातला कंटेंट राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं
सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्ट मधली पेन असतं
आणि जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेन नसतं
पटलं तर पप्पी आणि खटकलं तर खेटर असतं!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे रेअर हॅबिट असतं
वरती वरती लायन आतून भेदरलेलं रॅबिट असतं
शक्य शक्य हातांमधून थथरणारा वर्ड असतं
नुकतंच पंख फ़ुटलेलं क्युट क्युट बर्ड असतं
होपफ़ुल डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर असतं!!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे ऍग्रीमेंट असतं
५०% सर्टन आणि ५०% चं जजमेन्ट असतं
ऑपोनन्टच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेन्ड असतं
सगळा असतो थेट सौदा काहीसुद्धा लेन्ड नसतं
हार्ट देऊन हार्ट घ्यायचं सरळ साधं बार्टर असतं!!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक ड्रीम असतं
लाईफ़च्या पेस्ट्रीवरचं स्वीट स्वीट क्रीम असतं
अर्धं अर्धं प्यावं असं शहाळ्यामधलं वॉटर असतं
तिसयासाठी नाहीच असं अगदी प्रायव्हेट मॅटर असतं

* Poet – संदीप खरे

For more marathi poems/kavita, please visit Marathi Kavita Sangrah