Tag Archives: Diabetes Treatment

Diabetes Home Treatment – आयुर्वेदानुसार मधुमेहापासून मुक्ती अगदी घरच्या घरी


Diabetes Treatment – मधुमेहापासुन मुक्ती

Diabetes म्हणजेच मधुमेहापासुन कधीच सुटका होत नाही हेच आतापर्यंत बहुतांश मधुमेही ऐकत आले आहेत. पण हा लेख वाचून तुम्ही मधुमेह घरच्या घरी बरा करू शकता.

Diabetes Home Treatment

अतिरिक्त साखर पेशंटच्या रक्तात व लघवीत असेल तर त्याला वरचेवर लघवीला जावे लागते. तहानही खूप लागते तसेच भुकही वाढते. वजन वाढते किंवा कमी होते.

 

मधुमेहात रक्तातील साखर वाढते, ती १४० च्या वर राहिली तर काही वर्षानंतर हृदय, डोळे, किडणी या महत्वाच्या अवयावांवर परिणाम होतो.

सगळ्या मधुमेहीनी हे जाणणे  गरजेचे आहे की, त्याच्या शरीरात साखरेच्या व्यवस्थापणामध्ये अडथळे येण्याआधी काही अन्य मुळ कारणे असतात. ज्यामुळे मधुमेह होतो. त्यात महत्वाचे म्हणजे -शरीरात चरबी वाढणे, आम्लता वाढणे व पोषकद्रव्यांचा अभाव निर्माण होणे. बहुतांश टाईप २ मधील मधुमेहीमध्ये या तिन्ही बाबींचा कमी जास्त प्रमाणात समावेश असतो. टाईप २ मधुमेह साधारणपणे ९५% भारतीयांमध्ये आहे. तो वयाच्या पंचविशीनंतर सहसा होतो व गोळ्याची सुरवात होते.

टाईप १ मधुमेह साधारणत: ५ % भारतीयांमध्ये आहे. हा लहानपणी होतो आणि यात बाहेरुन इन्सुलिन घ्यावेच लागते.

 

या सर्व मुद्यावर मात करण्यासाठी  “फ्रिडम फ्राँम डायबेटीस” या संस्थेने एक सहज, साधी सोपी योग्य आहार-व्यायाम-तणावमुक्ती  व सकारात्मकता वाढविणारी कार्यप्रणाली विकसित केली आहे.

 

“रोज हिरवी स्मूदी घ्या व उत्तम आरोग्य मिळवा.” हे संस्थेचे ब्रीद वाक्य आहे. आजवर लाखो मधुमेही महाराष्ट्र व देशभर रोज स्मूदीचे सेवन करून स्वत:चे कल्याण करून घेत आहेत.

 

स्मूदीची पाककृती अशी आहे-

 

१. पालक, चुका, चाकवत, राजगिरा इत्यादी पालेभाज्यां पैकी एका भाजीची सात-आठ पाने व्यवस्थित धुवून मिक्सर मध्ये टाकावीत.

२. पुदीना वीस-पंचवीस पाने व विड्याचे एक पान त्यातच घालावे.

३. कधीतरी तुळस, कढीपत्ता, कोथिबीर आलटुन पालटुन चवीनुसार वापर करू शकता.

४. एक फळ शरीरातील साखरेचा अंदाज घेऊन वापरावे.

५. रक्त तपासणीत जेवणापुर्वीची साखर १०० पेक्षा जास्त व जेवणानंतरची साखर (दोन तासानंतर) १४० पेक्षा जास्त असल्यास सफरचंद किंवा पेर वापरावा.  कमी असल्यास केळे किंवा चिक्कु वापरता येतो.

६. या बरोबर दालचिनी पावडर व काळी मिरी पावडर चिमुट भर, सौंधव मीठ अर्धा चमचा, अर्धा लिंबाचा रस वापरावा.

७. पाणी एक ग्लास घालुन ३ मिनीट फिरवावे.

 

हे मिश्रण न गाळता ही हिरवी स्मूदी सकाळी उठल्यानंतर शक्यतो एका तासाचे आत प्यावी.

 

स्मूदीचे प्रमाण वाढविले की, प्रकृतीही लवकर सुधारते. घरातील लहान मुलांना व निरोगी सदस्यांनाही ही स्मूदी द्यावी. त्यांना खजुर किंवा गोड फळ घालुन दिल्यास खुप आवडते. हिरवी स्मूदी सर्वच परिवारासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे.

 

या व्यतिरीक्त नाश्त्यामध्ये मोड आलेले कडधान्ये, डाळींचे धिरडे, डोसे, अप्पे, थालपीठ यावर भर द्यावा.   “पोहे, उपमा सकाळी नाष्ट्याकरीता टाळावा”    जेवणात धान्य, डाळ, भाजी व सलाड समप्रमाणात खावे. जेवणानंतर दोन तासाने एखाद्या ८- १० पाय-यांचा जीना क्षमतेनुसार वर खाली करावा. याने जेवणानतरची साखर लवकर आटोक्यात येते.

 

‘फ्रीडम फ्राँस डायबेटीस’ च्या या शुध्द व नैसर्गिक प्रणालीवरील स्मूदीमुळे ५००० हून अधिक मधुमेही औषध व एक हजारहून अधिक इन्सुलिन पासुन पूर्णपणे मुक्त झाले आहेत.

 

या लोकांनी चक्क “ग्लुकोज टोलरन्स टेस्ट” ही पास केली आहे. ही टेस्ट करण्यासाठी, एखाद्या तपासणी केद्रांवर जाऊन उपाशी पोटी एका वेळेस १५ चमचे साखर (म्हणजे ७५ ग्रँम्स शुध्द ग्लुकोस) ३०० मिली पाण्याबरोबर घ्यावी लागते. जुन्या मधुमेहींना ही टेस्टपास करणे अतिशय अवघड असले तरी अनेकांनी ही टेस्ट पास केली आहे.

 

या स्मूदीचा मधुमेहाबरोबर शैकडोंना अतिरीक्त वजन कमी करण्यास, कोलेस्टोल, रक्तदाब, थायराँईड, आम्लपित्त, सांधेदुखी इ. आजारामध्येही भरपुर फायदा झाला आहे.

Bigthoughts.co gives special thanks to फ्रीडम फ्रॉम डायबेटीस (Freedom From Diabetes) for above health tips.

Hope you must have found this article useful. You may also find Health Tips from Ayurveda and Home Treatment for Heart Attack articles useful and interesting.