Tag Archives: Bhimsen Kapur

भीमसेन कापूर – एक चमत्कारिक आयुर्वेदीक कापूर – Bhimsen Kapur


भीमसेन कापूर (Bhimsen Kapur) –

Bhimsen Kapur (भीमसेन कापूर) हा एक चमत्कारी आयुर्वेदिक कापूर आहे. ह्याचे अनेक फायदे आहेत. शारीरिक व्याधीं ते अगदी पावसाळ्यात आणि इतर वेळेला आलेल्या घराचा आणि कपड्यांचा कुबटपणा पासून मुक्ती!!!

ह्यामुळेच भीमसेन कापूर (Bhimsen Kapur)  ह्याला चमत्कारी कापूर म्हटले जाते.

Bhimsen Kapur
PC: poojashoponline.com

भीमसेन कापूर (Bhimsen Kapur) चे काही महत्वाचे उपयोग:

 • Bhimsen Kapur (भीमसेन कापूर) कुठल्याही विशिष्ठ आकारात येत नाही स्फटीकासारखा येतो , ह्याचे गोल, चौकोनी वडीत रुपांतर करता येत नाही कारण नेहमीच्या कापराप्रमाणे ह्यात मेण नसते
 • सर्दी, खोकल्याकरीता एका पातेल्यात गरम पाणी करून मग त्यामध्ये हा कापूर चुरडून टाकावा व वाफारे घ्यावेत.
 •  नाकाला, कपाळाला, छातीला ही कापूर लावावा. लहान मुलांनाही लावला तरी चालेल.
 • रूमालावर कापूर चुरडून तो हूंगावा किंवा एखाद्या लहानशा डबीत घेऊन सोबत ठेवावा. व्हीक्सची सवय टाळा.
 • पर्यटनाच्या वेळी बर्फाळ स्थानात श्वास लागत असल्यास तो हुंगावा.
 •  तीळाच्या तेलातून तो सांध्यांना लावावा. तीळाच्या तेलाचा वास उग्र असल्यामुळे हे कापूरमिश्रीत तेल लावल्यावर कपड्यांना वास येतो त्यामुळे त्याची योग्यतोपरी काळजी घ्यावी .
 • हा कापूर केसातील कोंडा कमी करण्यासाठीही खूप उपयुक्त आहे: –
  • सतत सर्दी होत असेल तर त्यांनी तीळाच्या तेलात मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे.
  • नाहीतर खोबरेल तेलात हा कापूर मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे. शक्यतो शनीवारी किंवा रविवारी हा प्रयोग केल्यास उत्तम म्हणजे दुसरे दिवशी न्हाऊन तुम्ही कामावर जायला मोकळे.
 • नेहमीच्या कापरात मेण असते , त्यामुळे हा कापूर शूद्ध असल्यामुळे त्याचा वापर धार्मिक कार्यांत करावा. आरती करताना, गंध उगाळताना त्यात टाकावे, देवाला वीडा देताना कापूरमिश्रीत विडा देतात तो हाच कापूर, दक्षिण भारतात तीर्थांत वेलची आणि भीमसेन कापूर वापरतात, श्री बालाजी देवस्थान मधल्या सुप्रसिद्ध लाडवातही ह्याचा उपयोग केला जातो.
 • दाढदुखी करीता छोटासा खडा किडलेल्या दातात ठेवावा तो आपोआप विरघळतो व तू लाळ पोटात गेल्यास काही अपाय नाही.
 •  खोकल्याकरीता आयुर्वेदीक कंपनी ह्याच कापराचा उपयोग करतात.
 • सर्वात शेवटी हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे, ज्याचा त्याचा अनुभव व प्रारब्ध
 • संध्याकाळी ह्या कापराचे दोन लहान तुकडे हातामध्ये घेऊन घराची दृष्ट काढावी व घराबाहेर जुन्या पणतीत किंवा एखाद्या जुन्या भांड्यात हा कापूर जाळावा, प्रयोग करायला हरकत नाही, पूर्वी दृष्ट काढयचो तशी दृष्टच काढीत आहोत वास्तूची आपण, कदाचीत योगायोगाने आपले काम होईलही, तेही एका मर्यादेपर्यंतच.

टीप –आणखी काही खास उपयोग !

 

१ प्रवासी बॅग / कपडे साठवण्याची बॅग  मध्ये कपूर ठेवला तर कुबट वास किंवा ठेवणी चा वास न येत एक सुगंध येतो कपड्यांना कसर ,झुरळ लागत नाही.   पावसाळ्यात विशेषतः कपडे चांगले सुखत नाहीत  ओलसर राहतात मग असे कपडे बॅग मध्ये भरून कुबट वास येतो तो कापूर ठेऊन जातो

 

२ डास चावू नयेत म्हणून रात्री आपल्या सभोवती ठेवा डास फिरकत नाहीत च शिवाय इतर कीटक , उंदीर वगैरे लांब राहतात

 

३ कधी शेकोटी किंवा चूल पेटविणे जर त्रासदायक असेल तर काही कापराच्या वड्या ते काम सोपे करतात

 

४ रुमालात काही कापुराचे खडे रबर किंवा दोऱ्याने बांधून ठेवलेत तर रुमालाला सुगंध येतोच पण तो कापूर हुंगायला पण सोपे पडते –आणि चुकून रुमाल धुवायला गेला तरी हरकत नाही डाग नाही पडत आणि साबणाने तो विरघळत पण नाही

 

५ गुड नाईट किंवा इतर मॅट जाळायच्या यंत्रात त्या वर कापूर ठेऊन चालू करा तो कापूर विरघळून हवेत सुगंध पसरेलच पण डास पण पळून जातील आणि गुड नाईट पेक्षा जास्त सुरक्षित .

 

६ कापूर पायमोज्यात घालून ठेवा त्याचा कुबट वास आणि त्या मुळे पायाला येणारा कुबट वास नाहीसा होईल आणि शिवाय मोज्या मुळे जी खाज पायाला सुटते ती नाहीशी होईल. AC गाड्यांमध्ये AC जवळ लावला कि महागडे सेंट बाॅटलपेक्षा छान वास येतो आणि बरेच महिने टिकतो

 

नोट: भीमसेनी कापूर (Bhimsen Kapur) सर्व आयुर्वेदिक ओषधी दुकानात मिळेल

 

 For more articles on Ayurveda, please visit Health & Ayurveda Section