Shivaji Maharaj – शिवाजी महाराज – एक जगमान्य, महामुत्सद्दी, महापराक्रमी आणि अतुलनीय उत्तुंग व्यक्तिमत्व


Shivaji Maharaj – एक उत्तुंग व्यक्तिमत्व

Shivaji Maharaj (शिवाजी महाराज)

Shivaji Maharaj
PC: jaimaharashtratourism.blogspot.com
“आम्ही संपुर्ण जग फिरलो, संपुर्ण पृथ्वी आम्ही आमच्या अधिपत्याखाली आणली, पण या पृथ्वीवरील “भारत” देशावर आम्ही राज्यच कसं करू शकलो यावर आमचा विश्वास बसत नाही ! कारण या देशात  शिवाजी जन्माला आला होता !”
           — तत्कालिन ब्रिटिश पंतप्रधान अॅटली.

 

“जर  शिवाजी हा इंग्लंडमध्ये जन्माला आला असता तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केले असते !”
           — लॉर्ड माउंटबँटन, इंग्लंड.

 

“भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेन तर एकच पर्याय आहे,  शिवाजी प्रमाणे लढा !”
                — नेताजी सुभाषचंद्र बोस.

 

“नेताजी, तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या ‘हिटलर‘ची गरज नाही, तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या  शिवाजी च्या इतिहासाची गरज आहे !”
                   — अॅडॉल्फ हिटलर.

 

“शिवाजी हे फक्त नाव नाही, तर  शिवाजी ही आजच्या तरूण पिढीसाठी उर्जा आहे; जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो !”
                 — स्वामी विवेकानंद.

 

“जर  शिवाजी आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यास ‘सुर्य‘ संबोधले असते !”
              — बराक ओबामा, अमेरिका.

 

“जर  शिवाजी महाराज अजून १० वर्षे जगले असते, तर इंग्रजांना पुर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुध्दा पाहता आला नसता !”
                  — इंग्रज गव्हर्नर.

 

“काबुल पासुन कंदहार पर्यंत माझ्या तैमुर खानदानाने मोघली सत्ता निर्माण केली. इराक, इराण, तुर्कस्तानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमुर खानदानाने पाणी पाजलं ! पण हिंदुस्थानात मात्र आम्हाला  शिवाजीने रोखलं ! सर्व शक्ती मी शिवाजीचा पराभव करायला खर्च केली पण शिवाजी काही माझ्या हाती नाही आला ! या अल्लाह ! दुश्मन दिया भी तो कौण दिया?  सिवा_भोसला जैसा दिया. अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दुनिया का सबसे बहादुर योध्दा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है !”
              — औरंगजेब (छत्रपति शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर नमाज पढताना काढलेले उदगार, संदर्भ- खाफिखानाची बखर)

 

“उस दिन सिवा भोसलाने सिर्फ मेरी उंगलियां नही काटी, बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा. मै अब निंद मे भी सिवा भोसला से मिलना नही चाहता !”
               — शाहीस्तेखान, संदर्भ- खाफिखानाची बखर.

 

“क्या उस गद्दारे दख्खन से सिवा नाम का लोहा लाने के लिए एक भी मर्द नही है, इस दरबार में? लालत है ऐसी मर्दानगी पे !”
               — बडी बेगम अलि आदिलशाह.

 

१७ व्या शतकात युरोप खंडात “लंडन गॅझेट” नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं. जेव्हा महाराज आग्र्यावरून सहीसलामत सुटले, तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर जी पहिली बातमी छापली होती आणि त्यात शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांचा “Shivaji, The King of India” असा उल्लेख केला !

 

वरील उदाहरणावरून मी नेहमी जाणिवपुर्वक छत्रपती शिवरायांचा आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे म्हणुन उल्लेख करतो, जागतिक दर्जाचे योद्धे म्हणून शिवरायांची ओळख आहे ती यामुळेच ! महाराजांनी त्यांच्या ३० वर्षाच्या आयुष्यात ज्या ज्या सेनानींचा पराभव केला त्यामध्ये फक्त २ च भारतीय, बाकी सर्वजण हे परकिय सरदार आणि त्या त्या देशाचे नामांकित सरदार होते !

 

ज्या शाहीस्तेखानाची बोटे महाराजांनी लाल महालात छाटली आणि त्याच्या मनात शिवाजी या नावाचा खौफ निर्माण केला, तो शाहीस्तेखान साधासुधा मामुली सरदार नव्हता. तर तो अबू तालिबानचा नवाब होता, तुर्कस्तानचा नवाब होता ! प्रतिऔरंगजेब म्हणुन ओळखणारा हा शाहीस्तेखान औरंगजेबाचा सख्खा मामा होता. त्याने प्रचंड मोठा पराक्रम करून मोघलांना मोठा बंगाल प्रांत जिंकुन दिला होता. पण एका रात्रीत महाराजांनी लाल महालात घुसुन त्याची बोटे छाटली आणि काही कळायच्या आत पसार झाले ! परिणामी शाहीस्तेखानाने त्यानंतर शिवाजी या नावाची इतकी भिती घेतली की शिवाजीला आता मला स्वप्नात देखील भेटायचं नाही. असं त्याने औरंगजेबाला सांगितलं इतका खौफ या नवाबाच्या मनात निर्माण केला होता !

 

बेहलोलखान पठाण, सिकंदर पठाण, चिडरखाण पठाण इ. ज्यांना महाराजांनी रणांगणावर धुधु धुतलं, हे सर्व अफगाणिस्तानचे मातब्बर सरदार होते !

 

दिलेरखान पठाण, मंगोलियन सरदार, मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योध्दा होता हा ! महाराजांनी याचा पराभव केला !

 

सिध्दी जौहर, सिध्दी सलाबत खान हे इराणी होते, इराणचे शुर सरदार होते ! महाराजांनी यांना रणांगणात पाणी पाजलं !

 

उंबरखिंडीत ज्याचा कोंडुन पराभव केला, तो कारतलब खान उझबेकिस्तानचा सरदार होता, म्हणजे आत्ताच्या रशियाचा ! या महाराजांच्या विजयाची नोंद साक्षात गिनिज बुकाने देखील घेतली. कमीत कमी सैन्याने जास्तीत जास्त सैन्याचा केलेला पराभव ! (१००० मावळे विरूध्द ३०,००० गनिम आणि या ३०,००० पैकी एकही जिवंत राहीला नाही. आणि १००० पैकि एक ही मावळा गमावला नाही….

 

  ||| जय जिजाऊ जय शिवाजी जय भवानी |||

 

Bigthoughts.co तर्फे वरील लेखाचे लेखक ज्यांच्याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत त्यांचे मनःपूर्वक शतशः आभार मानते आणि त्याच बरोबर शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या वर इतका सुंदर लेख लिहिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

 

For more such inspiring articles like the one above on Shivaji Maharaj, please visit our Great Motivators Section

2 thoughts on “Shivaji Maharaj – शिवाजी महाराज – एक जगमान्य, महामुत्सद्दी, महापराक्रमी आणि अतुलनीय उत्तुंग व्यक्तिमत्व”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *