Shivaji Maharaj Related Short Story – “होता जिवा, म्हणून वाचला शिवा”


Shivaji Maharaj Related Short Story – “होता जिवा, म्हणून वाचला शिवा”

There are so many brave, energetic and exciting stories of King Shivaji Maharaj. This article is about a brave soldier (Sainik or Mavala) of Shivaji Maharaj called Pailwan Jivaji Mahar. In this article we get to know the event in which King Shivaji met Pailwan Jivaji. This is where Shivaji Maharaj identified hidden skills of Jivaji and selected him for noble cause of fighting Mughals. Later Jivaji saved Shivaji Maharaj’s life during the killing of Cruel Mughal Sardar Afzal Khan. That is when the proverb got into existence “Hota Jiva, mhanun Vachala Shiva”.

*” पैलवान जिवाजी महार “*

उमरठ हे गाव तसं ३५० वर्षांपूर्वी जेमतेम एक हजार वस्तीचे गाव.
सुभेदार तानाजी मालुसरे यांचे हे गाव.
गावात चारचौकी वाडा होता तानाजीरावांचा.
आज गावची यात्रा भरली होती. गावात सायंकाळी कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती.
राजांची आणि तानाजीरावांची मैत्री लहानपणापासूनची. मिसरूड फुटायचं व्हतं त्यावेळचे सवंगडी.
आज कुस्ती होती लखू बेरड या नावाजलेल्या पैलवानाची, त्याचे वस्ताद होते खुद्द बाजी पासलकर.
त्याच्याबरोबर लढणारा होता तो भिकाजी. हा हिरडस मावळ प्रांतातला. त्याचे वस्ताद होते दस्तूर खुद्द फुलाजी बांदल.
वास्तविक सर्व जण शिवाजी राजांना पाहायला जमणार होते आणि का नाही जमणार?
लेकीसुना, संत सज्जन ,गाई वासरे सारे सारे सुखावले होते राजांच्या मुळे. स्वराज्य आणले होते!
मैदान खचाखच भरले होते. लहान मोठ्या कुस्त्यांना प्रारंभ झाला.
आणि पूर्वेकडून दस्तुर खुद्द शिवाजीराजे भोसले यांचे अश्वदल दाखल झाले.
राज्यांनी पांढरा शुभ्र अंगरखा घातला होता.
कृष्णा नावाच्या आवडत्या घोडीवर स्वार होते आणि कमरेला  तलवार बांधली होती. जणू सह्याद्रीचे दैवतच भासत होते.
राजे घोड्यावरून खाली उतरले ..
तानाजीराव आपल्या फौजेसह राजांना भेटायला वाटेतच थांबले होते. राजांनी तानाजी रावांना मिठी मारली.
तितक्यात तिकडून एक खबर आली की, बाजी पासलकर यांच्या गावी रात्री एका नरभक्षक वाघाने हल्ला चढवला होता. त्यावेळी लखू बेरड स्वत: वाघाशी चार हात करायला गेला.
वाघाने त्याच्या पायाला जबर दुखापत केली होती. मात्र लखुने वाघाला नुसत्या हाताने ठार केले होते.
हे ऐकून मैदान खूप शांत झाले. खूप आशेने लोक कुस्त्या पाहायला मैलोन् मैल आले होते.
सर्वाना वाटत होते आता भिकाजीला १० शेर वजनाचे कडे आयते बक्षीस मिळणार होते तेही राजांच्या हस्ते.
” मंडळी, लखू बेरडाने काल नुसत्या हाताने वाघाला ठार केले ,पण त्याच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. म्हणून तो आज लढू शकत नाही.
या गावात असा कोण आहे का जो या भिकाजीशी दोन हात करू शकेल? कोणी असेल तर समोर या”
ही घोषणा ऐकून मैदानाच्या पश्चिमेकडे कुजबूज सुरु झाली.
इतक्यात एक भाल्यासारखा उंचापुरा रांगडा गडी कपडे काढून लांघ चढवून मैदानात येत होता. सर्व लोक जोरात ओरडत होते त्याला पाहून.
राजे हे सर्व पाहत होते.
तितक्यात कोणीतरी जोरात किंचाळला..
“आरं आला रं जिवा महार आला”
राजांनी चौकशी केली तानाजी रावांपाशी
तानाजी म्हणाले, ”राजं , ह्यो जिवाजी ,आपल्या हिकड चाच हाय, कुस्तीत लय भारी पवित्रा हाय याचा. दांडपट्टा तर लय चोख. फक्त परिस्थती नाय. याचं वडील आपल्या थोरल्या महाराजासंगत होतं.
निजामशाहीचा दंगा झाला तवा ह्येच्या बाचा उजवा पाय निकामी झाला. तेनच याला तयार केलाय”
राजांच्या चेहर्‍यावर एक तेज आले होते.
कुस्तीची सलामी झडली.
भिकाजी ने ठोक्यावर ठोके टाकून जिवाला नमवण्याचा प्रयत्न केला, पण जिवाजी पण तितक्याच ताकतीने तो चुकवत होता. डाव-प्रतिडाव करत एक अर्धा तास गेला.
भिकाजीने उसन्या अवसानाने पळत येवून पटात शिरायचा प्रयत्न केला खरा,पण सावध जिवाने फिरवून बाहेरची टांग लावली. भिकाजी अक्षरक्ष ५-६ फुट उडून पाठीवर पालथा झाला.
सगळे प्रेक्षक वेड्यासारखे आत घुसले. जिवाला अक्षरशः डोक्यावर घेवून नाचू लागले.
तितक्यात शिंगे-कर्णे गरजू लागली. खुद्द राजे येत होते.
पटापटा सर्वजण बाजूला झाले.
राजांनी हासत हासत जिवाला मिठीच मारली. मनात काय राजकारण होते माहीत नव्हते; मात्र राजे बेहद खुश झाले होते.
राजांनी १० शेराचे सोन्याचे कडे जिवाला बक्षीस दिले आणि विचारले “जिवा काय करतोस ??”
जिवा उद्गारला , ” काय नायजी, वरातीत पट्टा फिरवतो, दंगलीत कुस्त्या खेळतो”
राजे हसले आणि त्याला म्हणाले ”येशील का आमच्या सोबत? पट्टा फिरवायचा आणि कुस्तीही खेळायची. फक्त गानिमांच्यासोबत! आहे का कबूल?”
जिवा हसला. होकारार्थी मान हलवून त्याने राजांना मुजरा केला.
हाच तो जिवाजी ज्यानं अफजलखानाचा अंगरक्षक सय्यद बंडाचा हात हवेत वरच्यावर उडवून राजांचा प्राण वाचवला आणि तेव्हापासून ही म्हण प्रचलित झाली “होता जिवा, म्हणून वाचला शिवा”

 

Shivaji MaharajShivaji MaharajShivaji MaharajShivaji MaharajShivaji MaharajShivaji MaharajShivaji Maharaj

 

Shivaji Maharaj जय भवानी जय शिवाजी Shivaji Maharaj
For more such articles on India and India’s culture and heritage, please tune in to India – भारतवर्ष एक महान परंपरा

10 thoughts on “Shivaji Maharaj Related Short Story – “होता जिवा, म्हणून वाचला शिवा””

 1. I got this web site from my friend who informed me regarding this
  website and now this time I am browsing this site and reading very informative posts
  at this time.

 2. Hi! This is kond of off topic but I need some help from an established blog.

  Is it very difficult to set up yyour own blog?
  I’m not vrry techincal but I can figure things oout pretty quick.

  I’m thinking about creating my own but I’m not sure where to start.
  Do you have any tips or suggestions? Many thanks

 3. I like your post and your blog is very nice and simple. I will promote it to my facebook group. I think most of my member group will like your site. thanks

 4. Hey, found your web site by accident performing a search on Google but I’ll definitely be coming back. Man consists of two parts, his mind and his body, only the body has more fun.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *