Sani Peyarchi 2017 – २०१७, २०१८, २०१९, २०२० मधील १२ चंद्र राशींमधील शनी गोचर


Sani Peyarchi 2017 – 2020 – Shani Gochar in Moon Signs for 2017, 2018, 2019, 2020

Analysis of Sani Peyarchi 2017 – 2020 on 12 Moon Signs is given below:

Sani Peyarchi 2017 to 2020लोकांमध्ये शनी महाराजां बद्दल काही भ्रामक कल्पना आहेत कि ते खूप कडक आहेत,दंडप्रिय आहेत वगैरे वगैरे. वास्तविक पाहता शनी महाराज हे शिस्तप्रिय आणि न्यायप्रिय आहेत. जर तुम्ही न्यायाने आणि धर्माने जर योग्य वागलात तर शनी महाराज आपल्यावर खूप खुश होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद सुद्धा देतात. शनी महादशेत कित्येक लोकांची कधी नव्हे इतकी भरभराट झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. ते नीट पारख करून खात्री पटल्यानंतर योग्य व्यक्तीस भरभरून देतात. तेव्हा अश्या न्यायप्रिय, शिस्तप्रिय पण दयाळू शनी महाराजांच्या म्हणजेच शनी ग्रहाच्या १२ चंद्र राशींतील गोचरचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे आणि म्हणून आपण ह्या लेखात अगदी तसाच प्रयत्न करत आहोत.

शनी ग्रह एका राशीमध्ये साधारण पणे अडीच वर्षे राहतो.क्वचितच शनी एखाद्या गोचर मध्ये अगोदरच्या राशीत प्रवेश करतो. उदारहर्णार्थ २०१७ ह्या वर्षी शनी ग्रहाने २६ जानेवारी रोजी धनु राशीत प्रवेश केला, परंतु २१ जून रोजी त्याने वृश्चिक राशीत पुनर्प्रवेश केला. २७ ऑक्टोबर रोजी शनी ग्रह पुनश्च धनु राशी मध्ये प्रवेश करत आहे. तिथून पुढे तो धनु राशीत २४ जानेवारी २०२० पर्यंत राहणार आहे. २०१८ मध्ये शनी ग्रह १९ एप्रिल २०१८ ते ६ सप्टेंबर २०१८ हया काळात वक्री होत आहे. ६ सप्टेंबर २०१८ पासून तो पुन्हा सरळ मार्गी होणार आहे. पुढे २५ जानेवारी २०२० रोजी तो मकर ह्या त्याच्या स्वराशीत प्रवेश करणार आहे.

शनी ग्रहाचे हे धनु राशीतील गोचर तुला राशीच्या लोकांना शनी साडेसातीतून बाहेर काढत आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सडे सातीचे शेवटचे चरण असणार आहे. त्याच बरोबर धनु राशीच्या लोकांसाठी हा कडक सडे साती ठरणार आहे.

शनी साडेसाती पासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि शनी महाराजांची अनुकृपा प्राप्त करण्यासाठी खालील काही सोपे उपाय खूप फायदेमंद ठरू शकतात:

  • खोटे बोलू नये
  • कोणालाही फसवू अथवा दुखावू नये
  • दररोज मारुती रायाचे दर्शन घ्यावे.शक्यतो हनुमान चाळीस अथवा मारुती स्तोत्राचे नियमित पठाण करावे
  • न चुकता शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनी महाराजांचे दर्शन घ्यावे
  • काळ्या रंगाचे समाजोपयोगी वस्तूचे दान करावे. जसे लोखंडाच्या वस्तू किंवा काळे घोंगडे
  • एखाद्या गरजू व्यक्ती अथवा मंदिरातील पुजाऱ्यास अक्खी उरद डाळीचे दान द्यावे
  • थोरामोठ्यांचा आदर करून त्यांचे आशीर्वाद घावेत

 

हा लेख जर तुम्हाला आवडला असल्यास अथवा जर तुम्हाला आणखी शनी गोचर संबंधी माहिती वाचवायची असेल तर नक्की वाचा Saturn Transit 2017 – चंद्र राशींचे शनी गोचर २०१७ भाकीत.

शनी महाराजांची तुम्हा सर्वांवर सदैव कृपा राहावी अशी ईश्वर चरणी BigThoughts.co च्या वतीने प्रार्थना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *