Health Tips from Dr. Swagat Todkar – डॉ.स्वागत तोडकर, कोल्हापुर यांच्या व्याख्यानातील काही आरोग्यदायी टिप्स


Health Tips from Dr. Swagat Todkar – डॉ.स्वागत तोडकर, कोल्हापुर यांच्या व्याख्यानातील काही आरोग्यदायी टिप्स

Health Tips
                                      Health Tips
१) आंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे – सर्दी, खोकला, ताप येत नाही

 

२) पाय उत्तरेस व डोके दक्षिणेला करून झोपले तर लकवा (पॅरालीसीस) येत नाही.

 

३) रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर मुखदुर्गंधी निघून जाते व अपचन होत नाही.

 

४) रोज एक ग्लास ताक प्यायले तर हार्ट अटॅक येत नाही.

 

५) स्मरण शक्ती साठी रोज एक पेरू सलग १५ दिवस खाणे, मुलांना देणे.

 

६) वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस घेतला तर कॅन्सर होत नाही.

 

७) रोज ४ सीताफळाची पाने खाणे आणि ३ किलोमीटर चालणे – पहिले १ किलोमीटर रेगुलर चालणे हात पुढे व मागे – पोटावरची चरबी निघून जाते , दुसरे किलोमीटर कॅटवॉक सारखे चालणे एक रेषेत पाय पडले पाहिजेत, आतड्याला पीळ पडला पाहिजे – अपचनाचा त्रास होत नाही, पोटावरची चरबी निघून जाते, स्वादुपिंड काम करू लागते व शुगरचा त्रास होत नाही आणि तिसरे किलोमीटर आर्मी परेड सारखे चालणे.

 

८) रोज एक चमचा पांढरे तीळ खाणे – हाडे मजबूत होतात

 

९) ऐकू न येणे– चमचाभर कांद्याचा रस काढणे, एक थेंब मध टाकणे, कोमट पाण्यात घेऊन वस्त्रगाळ करणे व कानात टाकणे कानात कापूस टाकणे. ३ दिवस करणे किंवा ६ ते ७ दिवस करणे. १५ दिवस करणे

 

१0) शरीरशुद्धी साठी वर्षातून एकदा सलग ३ दिवस काही न खाता पिता फक्त ताजे ताक च पिणे. रात्री झोपताना थोडेसे पाणी चालेल. पहिल्या दिवशी काही होत नाही, संध्याकाळी थकवा जाणवल्या लागतो, लूझ मोशन सारखे होते. दुसऱ्या दिवशी पान त्रास होतो. तिसऱ्या दिवशी पूर्णपणे झोपून राहायला लागते. ४ थे दिवसापासून ८ दिवसापर्यन्त वरण भात खाणे – हिरवी मिरची ८ दिवस खाऊ नये.

 

११) जुलाबासाठी– चमचाभर मेथीचे दाणे अर्धा ग्लासात कोमट पाण्यात गिळणे.

 

१२) नाकाचे हाड वाढणे– ५ रिटा ३ काप पाण्यात टाकून १ चमचा सुंठ पावडर टाकणे आटवून एक कप करणे, वस्त्रगाळ करणे, काचेच्या बाटलीत ठेवून व रोज रात्री झोपताना २-२ थेम्ब नाकात ८ दिवस घालणे.

 

१३) मुळव्याधासाठी– अर्धा लिंबू व त्याच्यात सैंधव मीठ – ४ ते ५ चमचे टाकणे व लोणचे चाखल्यासारखे चाखणे. १० मिनिटात थांबते. वर्षातून ७ दिवस सकाळी व संध्याकाळी करणे. पोटपण सुटणार नाही

 

१४ ) वर्षातून फक्त एकदा शुद्ध संजीवनी १५ दिवस पिणे (250 मिली लिटर ) किंमत रुपये १२६०/- .फक्त फुलांचा व फळांचा रस आहे. सरबता सारखेय आहे. पथ्य काही नाही. कितीही काम केले तरी थकवा येत नाही कंबर दुखी, गुडघे दुखी, BP चा त्रास निघून जाईल. उष्णतेचा, मुळव्याधाचा, केस गळतीचा त्रास निघून जातो

 

15) लिंबू घेऊन त्याच्यावर खायचा सोडा टाकणे व दागिन्यांमुळे आलेल्या डागावर १ मिनिट चोळणे व तिसऱ्या मिनिटाला धुवून काढणे. सलग ७ दिवस केले तर डाग पूर्णपणे निघून जातात.

 

१६) ५ ते ६ चमचे दुघ घेऊन त्याच्यात लिंबू पिळायचा व अर्धा तास ठेवणे व चेहऱ्याला लावणे. आठवड्यातून एकदा करणे. कातडी गोल्डन रंगाची होते

 

१७) तुळशीच्या पानांचा रस रात्री लावला व सकाळी धुतला तर ब्युटी parlour ला जायची जरूर नाही. मेकअप करायची गरज नाही. चेहऱ्यावरचे सगळे काळे डाग निघून जातात.

 

१८) पोटाच्या आजारावर – वावडिंग चमचाभर वाटीभर पाण्यात रात्री भिजत घालणे, सकाळी उठल्यावर कडक पाण्यात उकळवून गाळून चमच्याने देणे.

 

१९) कानाच्या पडद्याला भोक – उसाचे कांडे घेणे, त्याला जाळात टाकून गरम करायचे व चमचाभर रस घेणे व एक थेम्ब मध टाकायचे, वस्त्रगाळ करणे व कानात टाकायचे, कापूस लावायचा.

 

२०) हात पायाला घाम येणे – सुपारीचे एक खांड – सकाळी व संध्याकाळी खाणे – १५ दिवस खाणे.

 

२१) लहान मुलांची छाती भरते, सर्दी झाली तर– अर्धा चमचा मोहरी घेऊन चेचायची व एक थेम्ब मध घालायचे – त्याच फक्त १ मिनिटं बाळाला वास द्यायचा.

 

२२) तुरटीच्या पाण्यात सलग ८ दिवस अंघोळ (३ महिन्यातून एकदा – असे वर्षातून ४ वेळा ) केले तर हात पायाला खाज येणार नाही, खरूज, नायटा गजकर्ण होणार नाही

 

—     डॉ.स्वागत तोडकर
          चेअरमन, संजीवनी आयुर्वेदीक
         चिकित्सालय,कोल्हापूर.
Bigthoughts.co तर्फे डॉ.स्वागत तोडकर यांचे Health Tips साठी विशेष आभार

 

Hope you have like Health Tips from Dr. Swagat Todkar article. You may also find Useful Tips from Ayurveda and Home Treatment for Heart Attack articles useful and interesting.

4 thoughts on “Health Tips from Dr. Swagat Todkar – डॉ.स्वागत तोडकर, कोल्हापुर यांच्या व्याख्यानातील काही आरोग्यदायी टिप्स”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *