Category Archives: Festivals

Information on Festivals across the world

Tulsi Vivah – Importance and Significance of Tulsi Vivah (तुलसी विवाह का महत्व)


तुळशी विवाह (Tulsi Vivah)

तुळशी विवाह (Tulsi Vivah) हा सण साजरा करण्याची पद्धत, या सणाची वैशिष्ट्ये, तुलसी दर्शनाचे महत्त्व, तुळशीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये, तुळशीचा विवाह प्रतिवर्षी श्रीकृष्णासमवेतच लावण्यासंबंधीची कथा, तसेच ‘देवाला नैवेद्य दाखवतांना तुळशीच्या पानांचा वापर का करावा ?’, यासंबंधीची माहिती येथे देत आहोत.

tulsi vivah
PC: IndiaMarks

१. तिथी

हा विधी कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी करतात.

२. पूजन

श्रीविष्णूचा (बाळकृष्णाच्या मूर्तीचा) तुळशीशी विवाह लावून देणे, हा तुळशी विवाहाचा विधी आहे. पूर्वीच्या काळी बालविवाहाची पद्धत होती. विवाहाच्या पूर्वदिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा अन् आवळे ठेवतात. हा विवाहसोहळा सायंकाळी करतात.

३. वैशिष्ट्ये

तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रतेघेतलेली असतील, त्या सर्वांची सांगता करतात. चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य केले असतील, ते पदार्थ ब्राह्मणाला दान देऊन मग स्वतः सेवन करतात.

तुळशी विवाहाच्या दिवशी सायंकाळी ब्रह्मांड पोकळीतील विष्णु आणि लक्ष्मी या तत्त्वांच्या सूक्ष्मतर लहरींचे ब्रह्मांडात आगमन होते. वातावरणातील विष्णु आणि लक्ष्मी या तत्त्वांच्या कार्याचे प्रमाण वाढून या लहरींचा संयोग घडून येतो. या लहरींच्या संयोग सोहळ्यालाच तुळशी-विवाह असे म्हणतात. तुळशीच्या रूपात लक्ष्मीची आणि श्रीकृष्णाच्या रूपात श्रीविष्णूची पूजा केली जाते. या दोन्ही तत्त्वांचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी सायंकाळी तुळशी-विवाह साजरा केला जातो. तुळशी विवाहाच्या मुहूर्त कालातच श्रीविष्णु-लक्ष्मी या दोन तत्त्वांच्या लहरींचे आगमन आणि संयोग घडून येत असतो. वातावरणातील या सात्त्विकतेचा फायदा मिळावा, यासाठी तुळशी-विवाह हा मुहूर्त कालातच करावा.

४. तुलसी दर्शनाचे महत्त्व

‘प्रत्येक हिंदूच्या घरी तुळस असायलाच हवी’, असा संकेत आहे. ‘सकाळी आणि सायंकाळी सर्वांनीच तुलसीदर्शन करावे’, असे सांगितले आहे. या तुलसीदर्शनाचा मंत्र पुढीलप्रमाणे आहे.

तुलसि श्रीसखि शुभे पापहारिणि पुण्यदे ।
नमस्ते नारदनुते नारायणमनःप्रिये ॥ – तुलसीस्तोत्र, श्‍लोक १५

अर्थ : हे तुलसी, तू लक्ष्मीची मैत्रीण, शुभदा, पापहारिणी आणि पुण्यदा आहेस. नारदाने स्तवलेल्या आणि नारायणाला प्रिय अशा तुला मी वंदन करतो.

५. तुळशीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

५ अ. पापनाशक : ‘तुलशीचे दर्शन, स्पर्श, ध्यान, नमन, पूजन, रोपण आणि सेवन या गोष्टी युगायुगांची पातके नष्ट करतात.

५ आ. पवित्रता : तुलसीचे बन असलेल्या परिसरातील कोसभर भूमी गंगेसारखी पवित्र बनते. या संदर्भात स्कन्दपुराणात (वैष्णवखण्ड, अध्याय ८, श्‍लोक १३ मध्ये) म्हटले आहे,

तुलसीकाननं चैव गृहे यस्यावतिष्ठते ।
तद् गृहं तीर्थभूतं हि नायान्ति यमकिङ्कराः ॥

अर्थ : ज्या घरी तुलसीचे वन आहे, ते घर तीर्थासारखे पवित्र होय. त्या घरात यमदूत येत नाहीत.

५ इ. सर्व देवतांचा वास असणे : ‘तुलशीच्या वनस्पतीत मुळापासून अग्रापर्यंत सर्व देवता वास्तव्य करतात’, असे सांगितले आहे.

५ ई. श्रीविष्णूला परमप्रिय असणे

१. तुलसी वृंदावनात रहाते. ती श्रीविष्णूला परमप्रिय आहे.

२. तुलसीदलाविना श्रीविष्णूची पूजा केल्यास ती व्यर्थ ठरते. पद्मपुराणात म्हटले आहे की, सुवर्ण, रत्ने आणि मोती यांची फुले श्रीविष्णूला वाहिली, तरी त्यांना तुलसीदलाच्या १६ व्या कलेचीही सर येणार नाही.

३. तुलसीपत्र ठेवल्यावाचून किंवा तुलसीदलाने प्रोक्षण केल्यावाचून श्रीविष्णु नैवेद्य ग्रहण करत नाहीत.

४. कार्तिक मासात (महिन्यात) तुलसीदलाने केलेल्या विष्णुपूजेचे माहात्म्य विशेष आहे.

५. श्रीविष्णु, श्रीकृष्ण किंवा पांडुरंग यांच्या गळ्यात तुळशीचा घवघवीत हार घालतात.

संदर्भ : ‘भारतीय संस्कृतीकोश’, खंड ४, पान क्र. १५५

६. तुळशीचा विवाह (Tulsi Vivah) प्रतिवर्षी श्रीकृष्णासमवेतच लावण्यासंबंधीची कथा !

देवांचे जलंधर दैत्याशी युद्ध चालू होते. त्या जलंधराची वृंदा नावाची पत्नी पतीव्रता होती. तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावामुळे देवांकडून जलंधर दैत्याचा वध होत नव्हता. श्रीविष्णूने जलंधराचे रूप घेऊन वृंदेचे पातिव्रत्य भ्रष्ट केले. त्याच वेळी श्रीविष्णूने वृंदेच्या पातिव्रत्यावर प्रसन्न होऊन तिला वर दिला, ‘वृंदा, तू तुळस होऊन सर्वांना वंदनीय होशील. तुझ्या तुलसीपत्राने भक्त माझी पूजा करतील. तसेच प्रतिवर्षी कार्तिक मासात तुझा विवाह माझ्याशी लावण्यात येईल.’ भगवान श्रीकृष्ण हा श्रीविष्णूचा पूर्णावतार आहे. त्यामुळे प्रतिवर्षी कार्तिक शुक्ल पक्ष द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी तुळशीचा विवाह (Tulsi Vivah) श्रीकृष्णाशी लावतात.

७. देवाला नैवेद्य दाखवतांना तुळशीच्या पानाचा वापर का करावा ?

देवाला नैवेद्य दाखवतांना तुळशीच्या पानांचा वापर केल्याने नैवेद्य देवतेपर्यंत लवकर पोचणे, सात्त्विक होणे आणि त्याच्यावर वाईट शक्तींचे आक्रमण होण्याची शक्यता न्यून होणे

७ अ. तुळशीचे वैशिष्ट्य : तुळस ही वनस्पती वायूमंडलातील सात्त्विकता खेचण्यात आणि ती प्रभावीपणे जिवाकडे प्रक्षेपित करण्यात अग्रेसर आहे. ब्रह्मांडातील श्रीकृष्णतत्त्व खेचून घेण्याची क्षमताही तुळशीत अधिक असते.

७ आ. लाभ

१. तुळशीच्या पानाने नैवेद्य दाखवल्याने सात्त्विक अन्नातून प्रक्षेपित होणार्‍या सूक्ष्म-लहरी तुळशीच्या पानाकडून ग्रहण केल्या जातात. असे सूक्ष्म-लहरींनी युक्त पान नंतर देवाला अर्पण केल्यामुळे देवतेच्या तत्त्वाकडून त्या लहरी पटकन ग्रहण केल्या जातात. अशा प्रकारे आपण अर्पण केलेले अन्न तुळशीच्या पानांच्या माध्यमातून देवतेपर्यंत लवकर पोचून देवता लवकर संतुष्ट होण्यास साहाय्य होते.

२. अन्नावर आलेले रज-तम कणांचे आवरण तुळशीचे पान नैवेद्यावर ठेवल्यामुळे न्यून (कमी) होते. तुळशीदलातून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक लहरींमुळे नैवेद्याभोवतीचे वायूमंडल शुद्ध झाल्याने नैवेद्यावर वाईट शक्तींचे आक्रमण होण्याची शक्यताही न्यून होते.

३. नैवेद्यावर भावपूर्णरित्या तुळशीदल ठेवल्याने ते त्याच्या उपजत गुणधर्माप्रमाणे देवतेकडून येणारे चैतन्य ग्रहण करून प्रभावीपणे नैवेद्याकडे संक्रमित करते. नंतर अशा नैवेद्याच्या सेवनाने जिवाच्या देहाला चैतन्यलहरी मिळण्यास साहाय्य होते.’

For more information on festivals of India, please visit our Festivals of India Section.

Laxmi Puja Vidhi for Diwali to seek Blessings of Goddess Laxmi


Laxmi Puja Vidhi for Diwali to seek Blessings of Goddess Laxmi

Laxmi Puja Vidhi

laxmi puja

Below are the Laxmi Puja vidhi steps to be followed  to worship Goddess Laxmi on Diwali occasion.

 

 

Purification of the house (pooja place)

Clean the house properly by sprinkling Gomutra (Cow Urine) and/or Gangajal. This will help purify the house or place of pooja.

 

Setting up the pooja platform (pooja paat)

Take the Pooja Paat (Chaurang) i.e. a raised platform and clean it properly. Put some handful of grains like wheat in the center of the platform.

 

Placing of the kalash (Copper round Pot, tambya or lota)

Now we need to place the kalash (tambya or lota) on the rice (grains) put in the center on the platform. Fill the kalash with up to 75% of water and put in 1 supari, 1 marigold flower, a coin and also some rice. Then put and arrange five mango leaves around the neck of the kalash in circular fashion.

 

Placing of Goddess Laxmi Idol

First put an appropriate size Pooja thali on top of the kalash. Then make a mountain of rice grains in the middle of the thali. Now draw a lotus or swastika over it using turmeric powder (haldi) and place the idol of Laxmi Mata in the center.

 

Placing of Idol of Ganesha (Our beloved Ganapati Bappa)

Ganesha bhagwan (our beloved Ganapati Bappa) is given the first pooja importance in every pooja. So put the idol of Lord Ganesha on the right side i.e. ideally the South-west direction assuming we are performing Pooja in conventional and most preferred East-West direction. Then apply a haldi-kumkum tilak on the forehead of Ganesha. Therefore, on the right side (South-West direction) of the kalash, place the idol of Ganesha. Apply a tilak of haldi and kumkum. Put some rice grains on the idol. Light a diya in front of the Lord Ganesha to seek his blessing for successful completion of Laxmi Pooja.

 

Placing of books of business and/or wealth related items

Now place the books of business and/or anything related to the wealth besides the arrangement.

 

Lighting of diya

Light a diya preferably a panch mukhi diya (oil lamp with 5 wicks) and place it in a thali along with some haldi, kumkum and rice grains. One can also put sandalwood and/or saffron paste, abeer and gulal.
Starting with the pooja and aarti.

Start the pooja first with kalash poojan by applying tilak to the kalash. Apply the same to the lota that is filled with water. Then offer flowers to Ganeshji, books, kalash etc.

 

Recite Diwali Puja mantra

Take some rice and flowers in your hand and then fold your hands together and with closed eyes, recite the Diwali pooja mantra of goddess Laxmi. One can even simply chant Lakshi mata’s name and also try to meditate for couple of minutes to invite her to visit your place and bless you.

 

Offering the flower

Offer the flower and rice to the Goddess Lakshi once again after the prayer is completed.

 

Giving Abhishek to the idol of Goddess Laxmi

Now pick up the idol of Goddess Laxmi and place it in a thali. Bathe it with water and then followed by panchamrita abhishek. Clean the idol with water again. Wipe the Laxmi idol and place it on the kalash again.

 

Putting the garland around the neck of the Goddess

Apply haldi and kumkum along with the rice to the idol. Place the garland made of cotton beads around the neck of the Laxmi Mata. offer marigold flowers and Bel leaves to Goddess. Burn agarbattis and dhoop.

 

Offering sweets & coconut

Offer coconut and place a supari on a supari leaf. Now put some haldi, kumkum and rice over it. Offer some puffed rice, coriander seeds and cumin seeds to the idol. Place some mithai, Diwali sweets, fruits and money or gold ornaments in front of it.

 

Performing the aarti

Worship the idol of Goddess Laxmi by performing the laxmi aarti.

 

Completion of Laxmi Puja Vidhi.

For more information on festivals of India, please visit our Festivals of India Section.

Kojagiri Purnima Importance – कोजागिरी पौर्णिमा महत्त्व


Kojagiri Purnima Importance – कोजागिरी पौर्णिमा महत्त्व

कोजागिरी पौर्णिमा ( Kojagiri Purnima) का साजरी करतात?

|| ॐ कुलदेवतोभ्यो नम:||

kojagiri purnimaको जागरती = कोण जागं आहे !….
अखंड लक्ष्मी प्राप्तीच्या व्रतांपैकीच एक अतीशय महत्त्वाचे आणि प्रभावी व्रत कोजागिरी पौर्णिमा लक्ष्मी-कुबेर-इंद्र-चंद्र आदी देवतांची महत्वाची पूजा.

5 ऑक्टोंबर गुरूवार
पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. अश्विन शु.पोर्णिमा म्हणजे ‘कोजागरी पोर्णिमा (Kojagiri Purnima)’ अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात.

त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे.हा उत्सव अश्विन शु. पोर्णिमा या दिवशी रात्री ठीक १२ ते १२.३९ या ३९ मिनिटात करायचा असतो. भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेरयांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येकाने आपल्या घरीच करावा. उपरोक्त वरील देवता या दिवशी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी असतात त्यांना अमृताचा (दुध) नवैद्य लागतो.
पूजाविधी मांडणी :-

मांडणी करतांना एका पाटावर किंवा चौरंगावर

१) लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोड पानावर सुपारी ठेवावी

२) विड्याच्या जोड पानावर कुबेराचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी.

३) तांदुळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांबा/गडवा, त्यात आंब्याचा डगळा इंद्राचे प्रतिक म्हणून घ्यावा.
अशी मांडणी रात्री १२ वाजेपर्यंत करून ठेवावी. रात्री ठीक १२ ते १२:३० या ३० मिनिटात दुधाचे भांडे चंद्राकिरणात ठेवावे. जेणे करून चंद्र देवता शलाका रुपात अमृताचा प्रसाद देतात.

४) चंद्राचे प्रतिक म्हणून चंदनाचा एक छोटा भरीव गोल बनवावा.

५) १२:३० ला पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद कुंकू, पांढरी फुले, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करावी. दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवावे. त्यात एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा व प्रार्थना म्हणावी

ऋण रोगादी दारिद्रयम अपमृत्यू भय I शोक मनस्ताप नाशयन्तु मम सर्वदा II
दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा. उपरोक्त सुपारी जपून ठेवून दरवर्षी पुजाव्यात. कोजागारीस त्यांची पूजा करावी. १२ ते १२:३० या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी. त्यात गायत्री या मंत्राचा १ माळ जप, श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र, श्री कुबेर मंत्र, प्रत्येक १ माळ जप करावा, तसेच १ वेळा स्त्री सुक्त, श्री व्यंकटेश स्तोत्र १ वेळा व गीतेचा १५ वा अध्याय वाचावा.

हा अतिशय महत्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा कार्यक्रम आहे. लक्ष्मी म्हणजे श्री, शोभा! लक्ष्मी अनेक प्रकारची आहे वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी हि परमदयाळू आहे. कृपाळू आहे, ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहिण मात्र संकटे आणते, त्रास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे.

या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की ‘अक्काबाईचा फेरा आला’ हि अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरते. कोण झोपले आहे कोण जागे आहे. ते ती पाहते अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागावते. पण जे जागरण करतात त्यांना सुख समाधान, संपत्ती लाभते असे म्हणतात. कोण जागतोय? कोजागर्ती? यावरून या पौर्णिमेला कोजागरी हे नाव पडले. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे तो पाहत असतो. वारंवार तो कोजागरती असे विचारतो यावरून हे नाव रूढ झाले

|| गुरुदेव दत्त ||

For more such spiritual and festival information, please refer our Spirituality Section.

Navratri 2017 – Dates of Durga Navratri, Navami and Vijayadashmi


Dates of Durga Navratri and Navami

Navratri starts with Durga Mata arrival (Ghatasthapana) on 21st September 2017 and ends with departure (Durga Visarjan) on 30th September 2017.

Following is day wise all necessary information on Durga Navratri:

Day 1: Pratipada

Date: 21st September 2017 (Thursday)

Color : Yellow

Significance: Mata Shailputri Puja ( मां शैलपुत्री की पूजा )

 

Day 2: Dwitiya

Date: 22nd September 2017 (Friday)

Color : Green

Significance: Mata Brahmacharini Puja ( मां ब्रह्मचारिणी की पूजा )

navratri

 

Day 3: Tritiya

Date: 23rd September 2017 (Saturday)

Color : Grey

Significance: Mata Chandraghanta Puja ( मां चन्द्रघंटा की पूजा )

 

Day 4: Chaturthi

Date: 24th September 2017 (Sunday)

Color : Orange

Significance: Mata Kushmanda Puja ( मां कूष्मांडा की पूजा )

 

Day 5: Panchami

Date: 25th September 2017 (Monday)

Color : White

Significance: Mata Skandamata Puja ( मां स्कंदमाता की पूजा )

 

Day 6: Shashthi

Date: 26th September 2017 (Tuesday)

Color : Red

Significance: Mata Katyayani Puja ( मां कात्यायनी की पूजा )

 

Day 7: Saptami

Date: 27th September 2017 (Wednesday)

Color : Royal Blue

Significance: Mata Kalaratri Puja ( मां कालरात्रि की पूजा )

 

Day 8: Ashtami

Date: 28th September 2017 (Thursday)

Color : Pink

Significance: Mata Mahagauri Puja ( मां महागौरी की पूजा )

 

Day 9: Navami

Date: 29th September 2017 (Friday)

Color : Purple

Significance: Mata Siddhadatri Puja ( मां सिद्धदात्री की पूजा )

 

Day 10: Dashmi

Date: 30th September 2017 (Saturday)

Significance: Durga Visarjan, Vijayadashami ( दशमी तिथि, दशहरा )

 

Following are few of the important and not-to-miss Dandiya and Garba events across Mumbai and Thane:

  • MeeRas Navratri 2017 at Kutchi Ground, Mumbai
  • Naidu Club Korakendra Navratri 2017 at Kora Kendra Ground, Borivali, Mumbai
  • Navratri Jalso 2017 Golden Tobacco Ground, Mumbai
  • 2 In 1 Show: The Golden Era (Old Bollywood Melodies) + Raas Garba at Prabodhankar Thackeray Auditorium Borivali(W), Mumbai
  • Purple Blue Events and Ideas Presents Radiance Dandiya at Hotel Sahara Star, Mumbai
  • Raas Leela Navaratri 2017 at Maitri Lawn, Borivali, Mumbai
  • Rajmahal’s Silent Garba at Rajmahal Banquets, Malad, Mumbai
  • RangiloRe – Celebrate Navaratri with Parthiv Gohil, Nesco Center, Mumbai
  • Ruparel Navaratri Utsav- 2017 at Late Shri Pramod Mahajan Sports Complex, Mumbai
  • Thane Raas Rang Navaratri 2017 at Modella Mill Compound, Thane

For more information on India, please visit our Festivals of India Section.

Indian Culture and Tradition – ओळख आपल्या भारतीय संस्कॄतिची


Indian Culture and Tradition

This article mentions all important aspects of Indian Culture and Tradition.

Indian Culture

  Indian Culture दोन पक्ष 🌿
(१) कृष्ण पक्ष ,
(२) शुक्लपक्ष

 

         🌿 ऋण 🌿
(१) देव ऋण ,
(२) पितृ ऋण ,
(3) ऋषि ऋण .

 

       🌿चार युग 🌿
(१) सतयुग ,
(२)त्रेतायुग ,
(३)द्वापरयुग ,
(४)कलियुग.

 

       🌿चार धाम 🌿
(१)द्वारका ,
(२)बद्रीनाथ ,
(३)जगन्नाथ पुरी ,
(४)रामेश्वरम धाम.

 

       🌿चार पीठ 🌿
(१)शारदा पीठ ( द्वारिका )
(२)ज्योतिष पीठ ( जोशीमठ बद्रिधाम )
(३)गोवर्धन पीठ ( जगन्नाथपुरी ) ,
(४)शृंगेरीपीठ !

 

       🌿चार वेद 🌿
(१)ऋग्वेद ,
(२)अथर्वेद ,
(३)यजुर्वेद ,
(४)सामवेद.

 

      🌿चार आश्रम🌿
(१)ब्रह्मचर्य ,
(२)गृहस्थ ,
(३)वानप्रस्थ ,
(४)संन्यास.

 

       🌿चार अंतःकरण🌿
(१)मन ,
(2)बुद्धि ,
(३)चित्त ,
(४)अहंकार.

 

       🌿पंच गव्य🌿
(१)गाईचे तूप
(२)दूध ,
(३)दही ,
(४)गोमूत्र ,
(५)शेण

 

       🌿पंच देव🌿
(१)गणेश ,
(२)विष्णु ,
(३)शिव ,
(४)देवी ,
(५)सूर्य.

 

        🌿पंच तत्त्व🌿
(१)पृथ्वी ,
(२)जल ,
(३)अग्नि ,
(४)वायु ,
(५)आकाश.

 

       🌿सहा दर्शन🌿
(१)वैशेषिक ,
(२)न्याय ,
(३)सांख्य ,
(४)योग ,
(५)पूर्व मिसांसा ,
(६)दक्षिण मिसांसा.

 

        🌿सप्त ऋषि🌿
(१)विश्वामित्र ,
(२)जमदाग्नि ,
(३)भारद्वाज ,
(४)गौतम ,
(५)अत्री ,
(६)वशिष्ठ,
(७)कश्यप.

 

       🌿सप्त पुरी🌿
(१)अयोध्यापुरी,
(२)मथुरापुरी,
(३)मायापुरी,
(४)काशी,
(५)कांची,
(६)अवंतिका,
(७)द्वारका पुरी.

 

       🌿आठ योग🌿
(१)यम,
(२)नियम,
(३)आसन,
(४)प्राणायाम,
(५)प्रत्याहार,
(६)धारणा,
(७)ध्यान,
(८)समाधी,

 

        🌿आठ लक्ष्मी🌿
(१)आग्घ,
(२)विद्या,
(३)सौभाग्य,
(४)अमृत,
(५)काम,
(७)सत्य,
(८)भोग आणी योग लक्ष्मी.

 

      🌿नव दुर्गा🌿
(१)शैल पुत्री,
(२)ब्रह्मचारिणी,
(३)चंद्रघंटा,
(४)कुष्मांडा,
(५)स्कंदमाता,
(६)कात्यायिनी,
(७)कालरात्रि,
(८)महागौरी,
(९)सिद्धिदात्री.

 

      🌿मुख्य दिशा चार🌿
(१)पूर्व,
(२)पश्चिम,
(३)उत्तर,
(४)दक्षिण

 

       🌿उपदिशा सहा🌿
(१)ईशान्य,
(२)नैऋत्य,
(३)वायव्य,
(४)आग्नेय,
(५)आकाश,
(६)पाताल.

 

    🌿मुख्य अवतारअकरा🌿
(१)मत्स्य्,
(२)कच्छप,
(३)वराह,
(४)नरसिंह,
(५)वामन,
(६)परशुराम,
(७)श्रीराम,
(८)कृष्ण,
(९)बलराम,
(१०)बुद्ध,
(११)कल्कि.

 

     🌿मराठी महिने बारा 🌿
(१)चैत्र,
(२)वैशाख,
(३)ज्येष्ठ,
(४)आषाढ,
(५)श्रावण,
(६)भाद्रपद
(७)अश्विन,
(८)कार्तिक,
(९)मार्गशीर्ष,
(१०)पौष,
(११)माघ,
(१२)फाल्गुन

 

   🌿बारा राशी🌿
(१)मेष,
(२)वृषभ,
(३)मिथुन,
(४)कर्क,
(५)सिंह,
(६)कन्या,
(७)तुला,
(८)वृश्चिक,
(९)धनु,
(१०)मकर,
(११)कुंभ,
(१२)मीन.

 

🌿बारा ज्योतिर्लिंग🌿
(१)सोमनाथ ,
(2)मल्लिकार्जुन ,
(३)महाकाल ,
(४)ओंकारेश्वर ,
(५)बैजनाथ ,
(६)रामेश्वरम ,
(७)विश्वनाथ ,
(८)त्र्यंबकेश्वर ,
(९)केदारनाथ ,
(१०)घुष्नेश्वर ,
(११)भीमाशंकर ,
(१२)नागेश्वर.

 

   🌿पंधरा तिथि🌿
(१)प्रतिपदा,
(२)द्वितीया,
(३)तृतीया,
(४)चतुर्थी,
(५)पंचमी,
(६)षष्ठी,
(७)सप्तमी,
(८)अष्टमी,
(९)नवमी,
(१०) दशमी,
(११)एकादशी,
(१२)द्वादशी,
(१३)त्रयोदशी,
(१४)पोर्णीमा,
(१५) अमावास्या !

 

        🌿स्मृतिया🌿
(१)मनु,
(२)विष्णु,
(३)अत्री,
(४)हारीत,
(५)याज्ञवल्क्य,
(६)उशना,
(७)अंगीरा,
(८)यम,
(९)आपस्तम्ब,
(१०)सर्वत,
(११)कात्यायन,
(१२) ब्रहस्पति,
(१३)पराशर,
(१४)व्यास,
(१५)शांख्य,
(१६)लिखित,
(१७)दक्ष,
(१८)शातातप ,
(१९)वशिष्ठ.

 

Bigthoughts.co is thankful to the anonymous author for such an informative article on India Culture and Tradition.

 

For more information on India, please visit our Festivals of India Section.

Nagpanchami Festival – श्रावण शुध्द पंचमी: – नागपंचमी


Nagpanchami Festival

श्रावण शुध्द पंचमी: – नागपंचमी (Nagpanchami)

फार पुर्वीपासुन आपल्याकडे नागाला देव मानून पुजा करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत रुढ आहे. शेतातील उंदरांचा साप नाश करतात म्हणून सापाला शेतकर्याचा मित्र म्हणतात . प्राणी व पक्षी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सण साजरे करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत फार पुर्वी पासून आहे . म्हणूच आपल्याकडे नागपंचमी साजरी केली जाते .
फार वर्षापुर्वी ’ नाग ’ वंशाचे लोक रहात होते. नंतर आर्यांचे भारतात आगमन झाले . आर्यं आणि नाग यांच्यात वारंवार भांडणे होत. एकदा अस्तिक ऋषींनी ही भांडणे मिटवली. नाग लोकांनी हा आनंद नाग पुजनाने व्यक्त केला . म्हणून नागपंचमी साजरी केली जाते . अशी एक पुराणात कथा आहे .
नागपंचमीबाबत दुसरी एक कथा अशी आहे की , कृष्ण गायीगुरांसह यमुनेच्या काठावर जात असे . त्या नदीतील कालिया नावाच्या सापाने गोकुळवासी भयभीत झाले होते परंतु श्रीकृष्णाने कालियामर्दन केले आणि त्याच्यावर विजय मिळवला तो दिवस श्रावण पंचमीचा होता . तेव्हापासुन नागपंचमीची प्रथा सुरु झाली असेही मानले जाते .
Nagpanchami
महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील “बात्तिस शिराळे” इथं नागपंचमीचा सण मोठया प्रमाणात साजरा केला जातो . तेथे जिवंत नाग पकडून त्याची पुजा करतात, नागाची वाजतगाजत मिरवणूक काढतात आणि पुजा झाल्यानंतर परत सोडुन देतात.
महाराष्ट्रात नागपंचमीचा सण सर्वत्र साजरा केला जातो . घरात नागाची प्रतिमा काढून किंवा नागाच्या मुर्ती आणून पुजा केली जाते . घरात नागाची पुजा केल्यानंतर त्याचे घरात वास्तव्य राहिल म्हणुन बाहेर जाऊन वारुळाचीसुध्दा पुजा केली जाते . नागोबाची पुजा करून त्याला दूध लाह्यांचा नैवद्य दाखवतात.
Nagpanchamiया दिवशी नागाला ईजा होऊ नये म्हणून शेतकरी शेतात नागंर देखील फिरवत नाही . या दिवशी घरात विळी देखील वापरली जात नाही . या सणाला नववधू माहेरी येतात, झिम्मा फुगडी खेळतात . झाडाला झोके बांधुन झोके खेळतात. पुर्वी लहान वयातच मुलींची लग्न होत. नववधुनां मोकळेपणाने खेळता यावे , मन मोकळे करता यावे यासाठी पंचमीच्या दिवशी गावाबाहेर झोपाळे बांधण्याची प्रथा आहे.
नागदेवतेबाबतची श्रध्दा आपल्याकडे फार पुर्वीपासुन दिसते . म्हणुनच देवदेवतांसोबत नागाच्या प्रतिमाही दिसतात. आपल्याकडे सापांबद्द्ल बर्याच गैरसमजुती आहेत, साप हा मांसाहारी आहे तो दुध पित नाही . सापाला कान नसतात त्यामुळे त्याला ऎकु येत नाही . तो पुंगीच्या आवाजावर नाही तर हलचालींवर डोलतो . सापाला स्मरण शक्ती नाही त्यामुळे त्याला डुख धरणे शक्य नाही . साप हा सरपटणारा भित्रा प्राणी आहे तो स्वसंरक्षणासाठीच चावा घेतो .
जगभरात सापाच्या एकूण २५००जाती आहेत त्यातील १५०जातींचे साप विषारी आहेत. भारतात २१६ जातींचे साप आढळतात त्यातील केवळ ५३ विषारी आहेत. नाग (कोब्रा ) घोणस , मण्यार हे साप अत्यंत विषारी आहेत.
“संकलन -उदयराज कुलकर्णी”
For more information on different festivals of India, please visit our Festivals Section.

Hindu Holidays in 2018 – Hindu Festivals of India in 2018


Hindu HolidaysHindu Holidays in 2018:

This diary provides the dates of Hindu holidays in 2018.

Feb 14, 2018  Maha Shivaratri Mar 2, 2018  Holi
Mar 26, 2018  Rama Navami Aug 26, 2018  Raksa Bandhana
Sep 3, 2018  Krishna Janmashtami  –  Kumbh Mela
Sep 13, 2018  Ganesha Chaturthi Oct 9, 2018  Navaratri
Oct 19, 2018  Dassera Nov 7, 2018  Diwali

For more India related Festival information, visit our Festival Section.

India Holidays 2018 – List of Holidays across States in 2018


India Holidays 2018

India Holidays 2018

India Holidays 2018 across States:

Below is the list of India Holidays 2018.

Date D India Holidays 2018 States
1 Jan, 2018 Mon New Year’s Day National
2 Jan, 2018 Tue New Year Holiday MZ
11 Jan, 2018 Thu Missionary Day MZ
12 Jan, 2018 Fri Swami Vivekananda Jayanti WB
14 Jan, 2018 Sun Pongal AP, AR, PY & TN
14 Jan, 2018 Sun Makara Sankranti GJ, KA, SK & TG
15 Jan, 2018 Mon Thiruvalluvar Day TN
15 Jan, 2018 Mon Kanuma Panduga AP
16 Jan, 2018 Tue Uzhavar Thirunal PY & TN
18 Jan, 2018 Thu Sonam Losar SK
22 Jan, 2018 Mon Vasant Panchami HR, OR, PB, TR & WB
23 Jan, 2018 Tue Netaji Subhas Chandra Bose Jayanati OR, TR & WB
24 Jan, 2018 Wed Sir Chhotu Ram Jayanti HR
25 Jan, 2018 Thu State Day HP
26 Jan, 2018 Fri Republic Day National
31 Jan, 2018 Wed Me-Dum-Me-Phi AS
31 Jan, 2018 Wed Guru Ravidas Jayanti CH, HP, HR & PB
10 Feb, 2018 Sat Maharshi Dayanand Sarswati Jayanti HR
14 Feb, 2018 Wed Maha Shivaratri National
16 Feb, 2018 Fri Losar SK
19 Feb, 2018 Mon Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti MH
2 Mar, 2018 Fri Holi AP, AS, JK, MN, UK, UP
& WB
3 Mar, 2018 Sat Holi National
5 Mar, 2018 Mon Panchayatiraj Divas OR
18 Mar, 2018 Sun Ugadi AP, GA, GJ, JK, KA, MH,
RJ & TG
18 Mar, 2018 Sun Telugu New Year TN
20 Mar, 2018 Tue Sarhul JH
22 Mar, 2018 Thu Bihar Day BR
23 Mar, 2018 Fri S. Bhagat Singh’s Martyrdom Day HR & PB
26 Mar, 2018 Mon Ram Navami National
29 Mar, 2018 Thu Mahavir Jayanti AR, CG, DL, DN, GJ, HR,
KA, LD, MH, MP, MZ, PB,
RJ, TN & UP
30 Mar, 2018 Fri Good Friday National
31 Mar, 2018 Sat Hazrat Ali Jayanti UP
1 Apr, 2018 Sun Odisha Day OR
1 Apr, 2018 Sun Easter Sunday KL & NL
5 Apr, 2018 Thu Babu Jagjivan Ram Jayanti AP & TG
13 Apr, 2018 Fri Bohag Bihu Holiday AS
14 Apr, 2018 Sat Vaisakh CH, HR, JK & PB
14 Apr, 2018 Sat Dr Ambedkar Jayanti National
14 Apr, 2018 Sat Tamil New Year PY & TN
14 Apr, 2018 Sat Bohag Bihu AS
14 Apr, 2018 Sat Maha Vishuba Sankranti OR
15 Apr, 2018 Sun Bengali New Year TR & WB
15 Apr, 2018 Sun Himachal Day HP
18 Apr, 2018 Wed Maharshi Parasuram Jayanti GJ, HP, HR & PB
18 Apr, 2018 Wed Basava Jayanti KA
1 May, 2018 Tue May Day AS, BR, GA, KA, KL, MN,
PB, PY, TG, TN, TR &
WB
1 May, 2018 Tue Maharashtra Day MH
9 May, 2018 Wed Guru Rabindranath Jayanti TR & WB
16 May, 2018 Wed State Day SK
29 May, 2018 Tue Buddha Purnima AN, AR, CG, CH, DL, HP,
HR, JH, JK, MH, MP, MZ,
TR, UK & UP
8 Jun, 2018 Fri Jumat-ul-Wida JK
15 Jun, 2018 Fri YMA Day MZ
15 Jun, 2018 Fri Raja Sankranti OR
15 Jun, 2018 Fri Idul Fitr National
16 Jun, 2018 Sat Maharana Pratap Jayanti HP, HR & RJ
16 Jun, 2018 Sat Idul Fitr Holiday TG
28 Jun, 2018 Thu Sant Guru Kabir Jayanti CG, HP, HR & PB
30 Jun, 2018 Sat Remna Ni MZ
6 Jul, 2018 Fri MHIP Day MZ
13 Jul, 2018 Fri Martyrs’ Day JK
14 Jul, 2018 Sat Ratha Yathra MN & OR
31 Jul, 2018 Tue Shaheed Udham Singh’s Martyrdom Day PB
14 Aug, 2018 Tue Haryali Teej HR
15 Aug, 2018 Wed Independence Day National
16 Aug, 2018 Thu De Jure Transfer Day PY
17 Aug, 2018 Fri Parsi New Year GJ & MH
22 Aug, 2018 Wed Bakrid / Eid al Adha National
23 Aug, 2018 Thu First Onam KL
23 Aug, 2018 Thu Bakrid / Eid al Adha Holiday JK
24 Aug, 2018 Fri Thiruvonam KL
26 Aug, 2018 Sun Raksha Bandhan CG, DD, GJ, MP, RJ, UK
& UP
3 Sep, 2018 Mon Janmashtami National
13 Sep, 2018 Thu Ganesh Chaturthi AP, DD, DN, GA, GJ, KA,
MH, OR, PY, TG & TN
14 Sep, 2018 Fri Nuakhai OR
14 Sep, 2018 Fri Ganesh Chaturthi Holiday GA
18 Sep, 2018 Tue Baba Sri Chand Ji Jayanti PB
19 Sep, 2018 Wed Ramdev Jayanti RJ
19 Sep, 2018 Wed Teja Dashmi RJ
20 Sep, 2018 Thu Muharram National
21 Sep, 2018 Fri Sree Narayana Guru Samadhi KL
23 Sep, 2018 Sun Heroes’ Martyrdom Day HR
28 Sep, 2018 Fri S. Bhagat Singh Ji Jayanti PB
2 Oct, 2018 Tue Gandhi Jayanti National
8 Oct, 2018 Mon Mahalaya Amavasye KA, OR, TR & WB
9 Oct, 2018 Tue First Day of Bathukamma TG
9 Oct, 2018 Tue Ghatasthapana RJ
10 Oct, 2018 Wed Maharaja Agrasen Jayanti HR & PB
16 Oct, 2018 Tue Maha Saptami OR, SK, TR & WB
17 Oct, 2018 Wed Maha Ashtami AP, JH, MN, OR, RJ, SK,
TG, TR & WB
18 Oct, 2018 Thu Maha Navami AS, BR, JH, KA, KL, ML,
NL, OR, PY, SK, TN, TR,
UP & WB
19 Oct, 2018 Fri Vijaya Dashami National
23 Oct, 2018 Tue Lakshmi Puja OR, TR & WB
24 Oct, 2018 Wed Maharishi Valmiki Jayanti CH, HP, HR, KA & PB
26 Oct, 2018 Fri Parkash Gurpurab of Sri Guru Ram Dass Ji PB
30 Oct, 2018 Tue Lhabab Duchen SK
31 Oct, 2018 Wed Sardar Vallabhbhai Patel Jayanti GJ
1 Nov, 2018 Thu Puducherry Liberation Day PY
1 Nov, 2018 Thu Haryana Day HR
1 Nov, 2018 Thu Kannada Rajyothsava KA
6 Nov, 2018 Tue Deepavali AP, GA, KA, KL, PY, TG
& TN
7 Nov, 2018 Wed Diwali National
8 Nov, 2018 Thu Vikram Samvat New Year GJ
8 Nov, 2018 Thu Deepavali Holiday DD, HR, KA, MH, ML, PB,
RJ, UK & UP
9 Nov, 2018 Fri Bhai Dooj GJ, RJ, SK, UK & UP
13 Nov, 2018 Tue Chhath Puja BR & JH
14 Nov, 2018 Wed Chhath Puja Holiday BR
21 Nov, 2018 Wed Eid e Milad National
23 Nov, 2018 Fri Karthika Purnima OR & TG
23 Nov, 2018 Fri Guru Nanak Jayanti National
23 Nov, 2018 Fri Friday Following Eid e Milad JK
26 Nov, 2018 Mon Kanakdasa Jayanti KA
3 Dec, 2018 Mon Feast of St Francis Xavier GA
5 Dec, 2018 Wed Sheikh Muhammad Abdullah Jayanti JK
18 Dec, 2018 Tue Guru Ghasidas Jayanti CG
19 Dec, 2018 Wed Liberation Day DD & GA
25 Dec, 2018 Tue Christmas Day National
26 Dec, 2018 Wed Shaheed Udham Singh Jayanti HR
26 Dec, 2018 Wed Christmas Holiday ML & MZ
30 Dec, 2018 Sun Tamu Losar SK
31 Dec, 2018 Mon New Year’s Eve MN

For more India Holidays 2018 like information, visit our Festival Section.

Ram Navami – Auspicious Day to Worship Lord Ram – राम नामाचे महत्व


श्रोतेहो आज आहे राम नवमी (Ram Navami). अश्या ह्या शुभदिनी जाणून घेऊया प्रभू रामचंद्रांच्या नावाचे महत्व. राम नामाला इतके महत्व का आहे?

ImporRam Navamitance of “Ram” naam (name) on the auspicious occasion of Ram Navami

राम राम! असे दोन वेळा का म्हणायचे 

आपण कधी विचार केला आहे का , की आपण “राम-राम” दोन वेळेस का म्हणतो.कारण~~~~~|-

र = २७ वा शब्द. ( क ख ग घ ड……….)

आ = २ रा शब्द. (अ आ..)

म = २५ वा शब्द शब्द.(अ आ…………)

एकूण = ५४.

राम + राम.

५४+५४ = १०८.

आपण जी गळ्यात माळ घालता तिचे मणि सुद्धा १०८ असतात.

ह्याचा अर्थ = आपण एका व्यक्तीला जर दोनदा  “राम-राम” म्हटले तर आपण एक माळ जप केला असा होतो…..तर मग म्हणा की  मंडळी ….

राम राम ….

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Benefits of Chanting Ram Naam

रामनाम घेत असतांना लक्ष नामावर स्थिर झाले की मन लक्ष+मन= *लक्ष्मण* होते

नामस्मरण  करताकरता मन उन्मन होते म्हणजेच *हनुमान* होते.

हनुमान झालेले हे मन भक्तीमध्ये रत झाले की *भरत* होते.

असे मन सततच्या नामस्मरणामुळे तृप्त होते, त्यातील विकार नाहीसे होतात ,शत्रुंचे हे मन हनन करते म्हणून ते *शत्रुघ्न* होते.

अशा नामस्मरणाने मन शांत होते शीतलता प्राप्त  करते म्हणजेच *सीता* होते.

सीता झालेल्या या मनात दुसरा कोणाचा विचार येऊ न शकल्याने ते *राम* स्वरूप होते.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

रामरक्षेच्या एका श्लोकाबद्दल- कदाचित माहिती असेलही सगळ्यांना….

 

रामो राजमणिः सदा विजयते रामं रामेशं भजे ।

रामेणाभिहतो निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।

रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासो$सम्यहम् ।

रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ।।

 

या श्लोकात राम या नामाच्या सगळ्या विभक्ती आल्या आहेत. रामो=रामः(प्रथमा) रामं(द्वितीया), रामेण(तृतीया), रामाय(चतुर्थी), रामान्नास्ति=रामात् (पंचमी)रामस्य(षष्ठी), रामे(सप्तमी),भो राम(संबोधन).

ह्या श्लोकात रकाराची पुनरावृत्ती असल्याने गर्भारपणात हा श्लोक म्हणल्याने जन्माला येणारे बाळ बोबडे (किंवा जीभ जड असलेले) होत नाही.

 

 रामरक्षा: म्हणजेच आरोग्यरक्षक कवच!!!

एक वेगळा पैलू तुमच्यासमोर मांडत आहे. श्रीरामरक्षा स्तोत्र हे आजही कित्येक घरांमध्ये तिन्हीसांजेला आवर्जून म्हटले जाते. आजारी व्यक्ती वा शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या रुग्णाला रामरक्षा ऐकवली जाते. रामरक्षाच का? असे काय रहस्य या मंत्रात दडले आहे?

 

रामनामकवच:

शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥४॥

कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।

घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥५॥

जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।

स्कंधौ दिव्यायुधः पातुभुजौ भग्नेशकार्मुकः ॥६॥

करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ ।

मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥७॥

सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।

उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत्‌ ॥८॥

जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः ।

पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥९॥

 

असे कवच या स्तोत्रात आलेले आहे. कवच म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करण्यासाठी मंत्र धारण करणे!! थोडक्यात; आपले संपूर्ण शरीरच रामनामाने अभिमंत्रित करणे. या कवचाची फलश्रुती मनीट पहा….

 

पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः ।

न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥ ११ ॥

 

म्हणजे, पाताळ, भूमी आणि आकाश या तिन्ही लोकांत संचार करणारे, छद्मचारिणः म्हणजे खोटे सोंग घेणारे असे (राक्षस) रामनामाने रक्षिलेल्या लोकांकडे नजर वर उचलून पण पाहू शकत नाहीत!!

आता, थोडं थांबा….’छद्मचारिणः’ हा शब्द पुन्हा वाचा. काही आठवलं? विज्ञान शिकत असताना ‘pseudopodium’ हा शब्द आपण शिकलेला असतो. अमिबासारखे जीव हे pseudopodium म्हणजे छद्मपाद म्हणून ओळखले जातात!! थोडक्यात; इथे ‘राक्षस’ हे अलिफ-लैला सारखे शिंगं वगैरे असलेले राक्षस नसून सूक्ष्मजीव आहेत. आयुर्वेदात विशेषतः सुश्रुत संहितेत कृमी, राक्षस असे शब्द अनेक ठिकाणी सूक्ष्मजीवांसाठी वापरण्यात आलेले आहेत.

 

आजवर वैद्यकीय उपचार करत असताना; अनेक वेळेला रामरक्षेचा लाभ झालेला मी पाहिला-अनुभवला आहे. यामागील कारण शोधता-शोधता ही गोष्ट हाती लागली. आजच्या मुहूर्तावरच ती लिहावीशी वाटली ही त्या रामचंद्राचीच कृपा. आपलेही असे काही अनुभव असतील तर जरूर सांगा.

जय श्रीराम!!

For more articles like Ram Navami, visit our Festivals of India.

Credit: Some unknown Devotee of Prabhu Shri Ram.

Shivaji Maharaj Related Short Story – “होता जिवा, म्हणून वाचला शिवा”


Shivaji Maharaj Related Short Story – “होता जिवा, म्हणून वाचला शिवा”

There are so many brave, energetic and exciting stories of King Shivaji Maharaj. This article is about a brave soldier (Sainik or Mavala) of Shivaji Maharaj called Pailwan Jivaji Mahar. In this article we get to know the event in which King Shivaji met Pailwan Jivaji. This is where Shivaji Maharaj identified hidden skills of Jivaji and selected him for noble cause of fighting Mughals. Later Jivaji saved Shivaji Maharaj’s life during the killing of Cruel Mughal Sardar Afzal Khan. That is when the proverb got into existence “Hota Jiva, mhanun Vachala Shiva”.

*” पैलवान जिवाजी महार “*

उमरठ हे गाव तसं ३५० वर्षांपूर्वी जेमतेम एक हजार वस्तीचे गाव.
सुभेदार तानाजी मालुसरे यांचे हे गाव.
गावात चारचौकी वाडा होता तानाजीरावांचा.
आज गावची यात्रा भरली होती. गावात सायंकाळी कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती.
राजांची आणि तानाजीरावांची मैत्री लहानपणापासूनची. मिसरूड फुटायचं व्हतं त्यावेळचे सवंगडी.
आज कुस्ती होती लखू बेरड या नावाजलेल्या पैलवानाची, त्याचे वस्ताद होते खुद्द बाजी पासलकर.
त्याच्याबरोबर लढणारा होता तो भिकाजी. हा हिरडस मावळ प्रांतातला. त्याचे वस्ताद होते दस्तूर खुद्द फुलाजी बांदल.
वास्तविक सर्व जण शिवाजी राजांना पाहायला जमणार होते आणि का नाही जमणार?
लेकीसुना, संत सज्जन ,गाई वासरे सारे सारे सुखावले होते राजांच्या मुळे. स्वराज्य आणले होते!
मैदान खचाखच भरले होते. लहान मोठ्या कुस्त्यांना प्रारंभ झाला.
आणि पूर्वेकडून दस्तुर खुद्द शिवाजीराजे भोसले यांचे अश्वदल दाखल झाले.
राज्यांनी पांढरा शुभ्र अंगरखा घातला होता.
कृष्णा नावाच्या आवडत्या घोडीवर स्वार होते आणि कमरेला  तलवार बांधली होती. जणू सह्याद्रीचे दैवतच भासत होते.
राजे घोड्यावरून खाली उतरले ..
तानाजीराव आपल्या फौजेसह राजांना भेटायला वाटेतच थांबले होते. राजांनी तानाजी रावांना मिठी मारली.
तितक्यात तिकडून एक खबर आली की, बाजी पासलकर यांच्या गावी रात्री एका नरभक्षक वाघाने हल्ला चढवला होता. त्यावेळी लखू बेरड स्वत: वाघाशी चार हात करायला गेला.
वाघाने त्याच्या पायाला जबर दुखापत केली होती. मात्र लखुने वाघाला नुसत्या हाताने ठार केले होते.
हे ऐकून मैदान खूप शांत झाले. खूप आशेने लोक कुस्त्या पाहायला मैलोन् मैल आले होते.
सर्वाना वाटत होते आता भिकाजीला १० शेर वजनाचे कडे आयते बक्षीस मिळणार होते तेही राजांच्या हस्ते.
” मंडळी, लखू बेरडाने काल नुसत्या हाताने वाघाला ठार केले ,पण त्याच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. म्हणून तो आज लढू शकत नाही.
या गावात असा कोण आहे का जो या भिकाजीशी दोन हात करू शकेल? कोणी असेल तर समोर या”
ही घोषणा ऐकून मैदानाच्या पश्चिमेकडे कुजबूज सुरु झाली.
इतक्यात एक भाल्यासारखा उंचापुरा रांगडा गडी कपडे काढून लांघ चढवून मैदानात येत होता. सर्व लोक जोरात ओरडत होते त्याला पाहून.
राजे हे सर्व पाहत होते.
तितक्यात कोणीतरी जोरात किंचाळला..
“आरं आला रं जिवा महार आला”
राजांनी चौकशी केली तानाजी रावांपाशी
तानाजी म्हणाले, ”राजं , ह्यो जिवाजी ,आपल्या हिकड चाच हाय, कुस्तीत लय भारी पवित्रा हाय याचा. दांडपट्टा तर लय चोख. फक्त परिस्थती नाय. याचं वडील आपल्या थोरल्या महाराजासंगत होतं.
निजामशाहीचा दंगा झाला तवा ह्येच्या बाचा उजवा पाय निकामी झाला. तेनच याला तयार केलाय”
राजांच्या चेहर्‍यावर एक तेज आले होते.
कुस्तीची सलामी झडली.
भिकाजी ने ठोक्यावर ठोके टाकून जिवाला नमवण्याचा प्रयत्न केला, पण जिवाजी पण तितक्याच ताकतीने तो चुकवत होता. डाव-प्रतिडाव करत एक अर्धा तास गेला.
भिकाजीने उसन्या अवसानाने पळत येवून पटात शिरायचा प्रयत्न केला खरा,पण सावध जिवाने फिरवून बाहेरची टांग लावली. भिकाजी अक्षरक्ष ५-६ फुट उडून पाठीवर पालथा झाला.
सगळे प्रेक्षक वेड्यासारखे आत घुसले. जिवाला अक्षरशः डोक्यावर घेवून नाचू लागले.
तितक्यात शिंगे-कर्णे गरजू लागली. खुद्द राजे येत होते.
पटापटा सर्वजण बाजूला झाले.
राजांनी हासत हासत जिवाला मिठीच मारली. मनात काय राजकारण होते माहीत नव्हते; मात्र राजे बेहद खुश झाले होते.
राजांनी १० शेराचे सोन्याचे कडे जिवाला बक्षीस दिले आणि विचारले “जिवा काय करतोस ??”
जिवा उद्गारला , ” काय नायजी, वरातीत पट्टा फिरवतो, दंगलीत कुस्त्या खेळतो”
राजे हसले आणि त्याला म्हणाले ”येशील का आमच्या सोबत? पट्टा फिरवायचा आणि कुस्तीही खेळायची. फक्त गानिमांच्यासोबत! आहे का कबूल?”
जिवा हसला. होकारार्थी मान हलवून त्याने राजांना मुजरा केला.
हाच तो जिवाजी ज्यानं अफजलखानाचा अंगरक्षक सय्यद बंडाचा हात हवेत वरच्यावर उडवून राजांचा प्राण वाचवला आणि तेव्हापासून ही म्हण प्रचलित झाली “होता जिवा, म्हणून वाचला शिवा”

 

Shivaji MaharajShivaji MaharajShivaji MaharajShivaji MaharajShivaji MaharajShivaji MaharajShivaji Maharaj

 

Shivaji Maharaj जय भवानी जय शिवाजी Shivaji Maharaj
For more such articles on India and India’s culture and heritage, please tune in to India – भारतवर्ष एक महान परंपरा