Category Archives: Beauty Tips

How to Remove Dark Circles Naturally – डार्क सर्कल्सना करा बाय बाय नैसर्गिकरित्या


How to remove dark circles? उत्तर जाणून घ्यायचे आहे? मग पुढे वाचा.

आजकाल बऱ्याच जणांना डार्क सर्केल (Dark Circles) च्या त्रासाने  हैराण केलं आहे. मग ती महिला असो वा पुरुष,तरुण मुलं-मुली.सगळ्याच जणांना ह्या डार्क सर्कल्स नी चिंतेत टाकले आहे.
डार्क सर्केल (Dark Circles) होण्याचे मुख्य कारण म्हणजे झोप पूर्ण न होणे आणि आपले रोजच धकाधकीचे जीवन.अजूनही काही कारण आहेत ते म्हणजे पाणी कमी पिणे,मानसिक ताणतणाव ,हार्मोन्स चे असंतुलन इत्यादी…


How to remove Dark Circlesघाबरू नका !!!

यावर खाली काही उपाय दिले आहेत ते करा आणि डार्क सर्कल्सना करा टाटा बाय बाय….
.
१.  दररोज ८ -१० ग्लास पाणी प्या यामुळे डार्क सर्केल कमी होतील आणि त्वचा ही स्वस्थ राहील व सतत होणारी वांती  थांबेल.

२. एक अतिशय वेगळा आणि सोपा उपाय म्हणजे रात्री झोपताना दोन चमचे फ्रीज मध्ये ठेवा आणि सकाळी उठल्यावर डोळ्यावर ठेवा .यामुळे डोळ्यांना थंडावा मिळेल.

३. बदामाच्या तेलाने हलक्या हातानी डोळ्याभोवती मसाज करा.आणि एक चमचा  बदाम तेलात एक चमचा मध मिक्स करून हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी डोळ्याखाली लावा.आणि सकाळी थंड पाण्यानी धुवून टाका.

४. लिंबुत असणारे ‘क’ जीवनसत्व डार्क सर्केल कमी करण्यात उपयोगी आहे. लिंबाच्या रसात कापसाचा बोळा बुडवून डोळ्याभोवती रस लावा.आणि १०-१२ मिनिटांनी धुवून टाका. असे सलग ७ दिवस प्रयोग करून पहा.

५.डार्क सर्केल कमी होण्यासाठी पोषक आहाराची गरज आहे.त्यासाठी आपल्या आहारात लोह,व्हिटॅमिन ए, सी,इ आणि  के जास्त प्रमाणात असायला हवेत. अशाप्रकारे तुम्ही आपल्या डोळ्यांचे सौदर्य खुलवू शकता.

नक्की करून पहा …..

Tune in for more articles like “how to remove dark circles”.

How To Apply Kajal Effectively – Tutorial on applying Kohls


करीना, कतरिना सारखं सुंदर दिसायचय? काजळ लावताय? Want to know how to apply Kajal?

मग हे नक्की करा!!!

Kajal

१. सर्वप्रथम चेहरा पाण्यानी स्वच्छ थुवून घ्या,मुख्य:त्वे करून डोळ्याच्या जवळपास आजिबात धूलिकण असता कामा नये.
.
२.चेहरा तेलकट असेल तर थोडी पावडर लावून घ्या,त्वचा कोरडी असेल तर मॉइश्चराझर लावा.

३.उत्तम प्रतीचे काजळ घ्या.काजल लावण्यापूर्वी ते फ्रीज मध्ये ठेवा. म्हणजे काजल लावताना डोळ्यांना थंडावा मिळेल.

४.सर्वात प्रथम काजळ वॉटर लाईनच्या बाहेरच्या बाजूस लावा.नंतर वॉटर लाईनवर मग आतल्या बाजूनी काळजीपूर्वक हलक्या हातानी काजळ लावा.

५. तुम्ही स्वतःच्या बोटानी ही काजळ लावू शकता.बोटानी काजल लावताना बोट सफाईदारपणे आतून बाहेरच्या दिशेस फिरवा.

६.काजळ पेन्सिल वापरायची असेल तर ,पेन्सिल चे टोक पातळ असू द्या.जेणेकरून काजळ चांगले लावता येईल.

Tune in for more how to articles on applying cosmetics like Kajal or Kohls.