Category Archives: Kavita Kosh

Online space to find kavita, poems from various renowned poets in Marathi, Hindi and English.

Love Poem for Wife – तू माझ्यासाठी काय आहेस? – A Marathi Kavita


Love Poem for Wife

This is an excellent lovlove poem for wifee poem dedicated to Wife. Here the poet is expressing his feelings about what his wife means to him.

Love Poem – “तू माझ्यासाठी काय आहेस?”

तू माझ्यासाठी काय आहेस?
एक गुणी दवादारू आहेस,
दवा होऊन बरं करतेस,
आणि दारू बनून चेतवतेस !

तू माझ्यासाठी काय आहेस?
एक कधीही न मालवणारी ज्योत आहेस,
माझ्या सुखी जगण्याचा सौर्स ( Source ) आहेस,
स्वप्नपूर्तीच्या मागचा फोर्स ( Force ) आहेस !!

तू माझ्यासाठी काय आहेस?
मी बुडत असताना मिळालेल्या काडीचा आधार आहेस,
कोणाचीही साथ नसताना मिळणारी साथ आहेस,
मी त्या वेळी उध्वस्थ न होण्यासाठीचा दिलेला हात आहेस !!!


 

Tu mazyasathi kai ahes
Ek guni davadaru ahes
Davyane bare karates
Ani darune chetavates

Tu mazyasathi kai ahes
Ek kadhihi na malavanari jyot ahes
mazya sukhi jaganyacha source ahes
Swapnapurtichya magacha force ahes

Tu mazyasathi kai ahes
Mi budat asatana milalelya kadicha aadhar ahes
Konachihi saath nasatana milanari saath ahes
Mi tya veli udhwastha na honyasathicha dilela haat ahes

♠♠♠♠♠♠♠ A lovely Poem by Kavi SanBa ♠♠♠♠♠♠♠

For more Marathi poems (Kavita), please visit Marathi Poems

Marathi Kavita Umbarache Phool – उंबराचे फूल – A Romantic Love Poem


Marathi Kavita Umbarache Phool – उंबराचे फूल

marathi kavita umbarache phool

 

 

 

 

नयन हे प्यासे तुझ्या दर्शनाचे,
भाव कळतील का माझ्या मनाचे !

तू गं उंबराच्या फुलावानी,
मज देतेस सदा हुलकावणी !

जीव व्याकुळ तुझ्या गोड़ हसण्याचा,
कधी होईन अंतर्मुख तुझ्या मिलनाचा !

पाहून तुझी शुभ्र कांचनमृगी काया,
मज वाटे जीवन हे तुजविण वाया !!!

*** A poem by Kavi SanBa ***

Marathi Poem Umbarache Phool

Nayan he pyase tuzya darshanache,
bhaav kalatil ka mazya manache !

Tu ga umbarachya phoolawani,
maj detes sada hulkavani !

Jeev Vyakul tuzya goad hasnyacha,
kadhi hoin antarmukh tuzya milanacha !

pahun tuzi shubhra kanchanmrugi kaya,
maj vate jeevan he tuzvin vaya !!!

For more marathi poems (Kavita), please visit Marathi Poems

Kavita on Project Management – आजकालचे मानवी ध्येय


        Marathi Kavita – आजकालचे मानवी ध्येय

आजकाल माणूस म्हणून जगायचे म्हणजे काही खायचे काम नसतं,
कितीही जवळ आहे असं वाटलं तरीही ध्येय लांबच असतं!

ध्येयासाठी दूरदूरवर चालत जात राहायचं असतं,
कितीही अडथळे आले तरीही कुठंही थांबायचं नसतं!

फसगत होऊ नये म्हणून कोणावरही जास्त विसंबून रहायचं नसतं,
कितीही आप्त-स्वकीय पाठीशी असले तरीही एकट्याने चालत जात रहायचं असतं!

जवळच्या कोणालाही बिभीषण होऊ द्यायचं नसतं,
कितीही झाले तरी स्वतःलाही रावण मात्र होऊ द्यायचं नसतं!

ध्येय दृष्टीक्षेपात येताच सर्वाना बरोबर घ्यायचं असतं,
आणि यश मिळताच त्याचे श्रेय सर्वांना वाटून द्यायचं असतं!

ह्यातच ध्येयप्राप्तीचे गमक दडलेलं असतं,
आणि ह्यालाच प्रोजेक्ट मॅनॅजमेन्ट असं म्हणायचं असतं !!!

***************************कवी “संबा”******************************

Kavita Project Management

                                   Aajkaalcha Manavi Dhyey

Aajkaal Manus Mhanun jagayache mhanje kahi Khayache kaam nasata,
Kitihi javal ahe asa vatala tarihi dhyey lambach asata!

Dheyasathi durdurvar chalet jaat rahayache asata,
Kitihi adathale aale tarihi kuthehi tambayacha nasata!

Fasagat hovu naye mhanun konavarhi jasta visambun rahayacha nasata,
Kitihi aapta svakiya pathishi asale tarihi ektyane chalat rahayacha asata!

Javalachya konalahi bibhishan hovu dyayacha nasata,
Kitihi jhale tari swatahlahi Ravan matra hovu dyayacha nasata!

Dhey drustikshepat yetach sarvana barobar ghyayacha asata,
Ani yash milatach tyache shreya sarvanna vatun dyayacha asata!

 

 

 

Marathi Kavita – Nastik, Interested in reading marathi poem “नास्तिक”


Marathi Kavita – Nastik

Below is the marathi kavita from renowned Marathi poet Sandeep Khare.

marathi kavita

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा खर तर गाभा-यातच भर पडत असते
की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना,
पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा होते निर्माण
देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा को-या नजरेने पाहत राहतो
सभोवतालच्या हालचाली, भाविकाच्या जत्रा…
कोणीतरी स्वत:चे ओझे , स्वत:च्याच पायावर
साभाळत असल्याचे समाधान लाभते देवलाच !

म्हणून तर एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदचित !
पण मिळते आकठ समाधान एक सहकारी लाभल्याचे

देऊळ बद झाल्यावर एक मस्त आळस देउन
बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता
देव म्हणतो, ” दर्शन देत जा अधुन मधुन……..
तुमचा नसेल विश्वास आमच्यावर,
पण आमचा तर आहे ना ! ”

देवळाबाहेर थाबलेला एक खरा खुरा नास्तिक
कटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारिने पाठवतो देवळात
तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन
अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे….

* Poet – संदीप खरे

For more marathi poems, please visit Kavita Sangrah

Aayushyavar Bolu Kahi – आयुष्या वर बोलू काही


Marathi Kavita – Aayushyavar Bolu Kahi

Marathi Kavita - Aayushyavar Bolu Kahiजरा चुकीचे… जरा बरोबर……
जरा चुकीचे, जरा बरोबर , बोलू काही…..
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही……

उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू ..
उगाच वळसेे शब्दांचे हे देत रहा तू ….
भीडले नाहीत डोळे तोवर , बोलू काही……
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही……….

तूफान पाहून तीरा वर , कुजबुज्ल्या होडया ..
तूफान पाहून तीरा वर , कुजबुज्ल्या होडया ….
पाठ फीरू दे त्याची, नंतर बोलू काही……..
चला दोस्त हो ;आयुष्या वर बोलू काही……….

हवे-हवे से दुखः तुला जर, हवेच आहे ..
हवे-हवे से दुखः तुला जर, हवेच आहे ….
नको-नको से हळवे कातर, बोलू काही…….
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही……….

“उदया-उदया” ची कीती काळजी , बघ रांगेतुन..
“उदया-उदया “ची कीती काळजी , बघ रांगेतुन….
“परवा” आहे “उदया”च नंतर, बोलू काही……..
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही……….

श्ब्द असू दे हातां मध्ये, काठी म्हनुनी..
श्ब्द असू दे हातां मध्ये, काठी म्हनुनी….
वाट आंधळी, प्र्वास खडतर ,बोलू काही …….
चला दोस्त हो , आयुष्या वर बोलू काही……….

चला दोस्त हो , आयुष्या वर बोलू काही……….

* संदीप खरे

For more marathi poems/kavita, please visit Marathi Kavita Sangrah

Marathi Kavita – Love Letter – लव्हलेटर…….


Marathi Kavita – Love Letter

Marathi Kavita - Love Letterलव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं
सरळ जाऊन बोलण्यापेक्ष इझी आणि बेटर असतं
गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं
घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असतं

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक सॉंग असतं
ज्यातला कंटेंट राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं
सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्ट मधली पेन असतं
आणि जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेन नसतं
पटलं तर पप्पी आणि खटकलं तर खेटर असतं!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे रेअर हॅबिट असतं
वरती वरती लायन आतून भेदरलेलं रॅबिट असतं
शक्य शक्य हातांमधून थथरणारा वर्ड असतं
नुकतंच पंख फ़ुटलेलं क्युट क्युट बर्ड असतं
होपफ़ुल डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर असतं!!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे ऍग्रीमेंट असतं
५०% सर्टन आणि ५०% चं जजमेन्ट असतं
ऑपोनन्टच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेन्ड असतं
सगळा असतो थेट सौदा काहीसुद्धा लेन्ड नसतं
हार्ट देऊन हार्ट घ्यायचं सरळ साधं बार्टर असतं!!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक ड्रीम असतं
लाईफ़च्या पेस्ट्रीवरचं स्वीट स्वीट क्रीम असतं
अर्धं अर्धं प्यावं असं शहाळ्यामधलं वॉटर असतं
तिसयासाठी नाहीच असं अगदी प्रायव्हेट मॅटर असतं

* Poet – संदीप खरे

For more marathi poems/kavita, please visit Marathi Kavita Sangrah